
World Cup 2023 Schedule : बीसीसीआयने आज (दि. 27) भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. यंदाचा वनडे वर्ल्डकप 5 ऑक्टोबर पासून 19 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. बीसीसीआयने वेळापत्रकाची घोषणा केल्यापासून वर्ल्डकपसाठीचा भारताचा संघ कसा असेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याही वर्ल्डकपमध्ये निवडसमिती काही आश्चर्याचे धक्के देऊ शकतात. यात अश्विनसह पाच खेळाडू असे आहेत जे संघात पुनरागमन करू शकतात.
रविचंद्रन अश्विन गेल्या काही काळापासून वनडे संघातून बाहेर आहे. वेस्ट इंडीज विरूद्धच्या संघात स्थान मिळालेले नाही. विंडीज दौऱ्यावरील संघात एकही ऑफ स्पिनर नाहीये. अश्विनचा अनुभव पाहता भारतात तो चांगला पर्याय ठरू शकतो. गेल्या टी 20 वर्ल्डकपमध्येही संघात त्याची अशी आश्चर्य करणारी एन्ट्री झाली होती. यंदाच्या वनडे वर्ल्डकपमध्येही असं होऊ शकतो.
भारताचा अनुभवी मध्यमगती वेगवान गोलंदज भुवनेश्वर कुमार टी 20 वर्ल्डकपनंतर भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने शेवटची वनडे 2022 च्या सुरूवातीला खेळली होती. मात्र यावेळी भारताचे अनेक प्रमुख वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त आहेत. बुमराह वर्ल्डकप खेळेल की नाही याबाबत शंका आहे. प्रसिद्ध कृष्णा देखील दुखापतग्रस्त आहे. अशा परिस्थितीत भुवनेश्वर कुमारचा संघात नंबर लागू शकतो.
ऋषभ पंत सध्या एनसीएमध्ये दुखापतीतून सावरण्यासाठी घाम गाळतोय. तो मैदानापासून गेल्या सहा महिन्यापासून दूर आहे. मात्र तो आपल्या दुखापतीवर वेगाने मात करत असून त्याची प्रगती उत्तम प्रकारे सुरू आहे. ऋषभ पंत वनडे वर्ल्डकप खेळण्याची शक्यता फार कमी असली तरी तो तीन महिन्यानंतर होणाऱ्या वर्ल्डकपच्या संघात दिसूही शकतो.
भारतीय वनडे संघात चौथ्या क्रमांकावर खेळणारा श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त आहे. त्याच्या जागी सूर्यकुमार यादवने घेतली आहे. मात्र त्याच्या कामगिरीत देखील सातत्य नाही. भारताच्या मधल्या फळीत अनुभवाची कमतरता आहे. त्यामुळे निवडसमिती अजिंक्य रहाणेला पुन्हा संघात आणू शकतात.
यंदाच्या आयपीएलमध्ये मोहित शर्माने सर्वांनाच सुखद धक्का दिला. त्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन करत गुजरातकडून चांगली कामगिरी केली. आयपीएल फायनलचे शेवटचे षटक जरी खराब गेले असले तरी जर जयदेव उनाडकट 10 वर्षांनी संघात पुनरागमन करू शकतो तर मोहित शर्मा देखील करू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.