World Cup Final 2023: भारत वर्ल्डकप जिंकला तर 100 कोटी रुपये वाटणार! फायनल आधी कोणी केलीए घोषणा?

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये उद्या क्रिकेट वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे.
Ind vs Aus World Cup Final 2023
Ind vs Aus World Cup Final 2023

Cricket WorldCup Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये उद्या क्रिकेट वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे. हा सामना जिंकत वर्ल्डकप कोणाचा होईल याबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. भारताचाच विजय होईल असा ठाम विश्वासही अनेकांनी व्यक्त केला आहे.

त्यातच 'अॅस्ट्रोटॉक'चे सीईओ पुनीत गुप्ता यांनी देखील एक मोठा दावा केला आहे. जर भारतानं वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली तर कंपनीकडून युजर्सना १०० कोटी रुपयांचं वाटप करण्यात येणार आहे. (World Cup Final 2023 If India wins 100 crore rupees will be distributed Astrotalk CEO Puneet Gupta announcement)

पुनीत गुप्तांनी म्हटलं की, "गेल्यावेळी मी माझ्या काही मित्रांसोबत वर्ल्डकपचा आनंद लुटला होता. पण यावेळी माझ्यासोबत आमचे युजर्स आहेत. ते देखील मला मित्रांसारखेच आहेत. त्यांच्यासोबत आनंद लुटण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळं आज सकाळी मी माझ्या फायनान्स टीमसोबत चर्चा केली आणि आपल्या युजर्सना १०० कोटी रुपयांचं वाटप करण्याची शपथ घेतली. जर भारत वर्ल्डकप जिंकला तर युजर्सच्या वॉलेटमध्ये पैशांचं वाटप केलं जाणार आहे" (Latest Marathi News)

Ind vs Aus World Cup Final 2023
Rohit Sharma Rahul Dravid : द्रविडनं 2022 च्या वर्ल्डकपनंतर.... रोहितनं सांगितलं द्रविडनं संघाला कसं सावरलं

२०११ च्या आठवणी झाल्या ताज्या

दरम्यान, पुनीत गुप्तानं सन २०११ च्या वर्ल्डकपमध्ये भारताच्या विजयाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. लिंक्डइनवर एका पोस्टमध्ये पुनीत गुप्ता यांनी लिहिलं की, गेल्यावेळी भारतानं २०११ मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी मी कॉलेजमध्ये शिकत होतो. त्यावेळचा सामन्यातील थरारही त्यांनी सांगितला. सामन्याच्या पूर्वसंध्येला आम्ही नीट झोपूही शकलो नव्हतो. संपूर्ण रात्रभर आम्ही सामन्याच्या रणनितीवर चर्चा करत होतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Ind vs Aus World Cup Final 2023
IND vs AUS Final : फोटोचा इतिहासच सांगतो ट्रॉफीवर कब्जा रोहितचाच... दोन कर्णधार पोहचले ऐतिहासिक अडालज विहिरीवर

भारत-ऑस्ट्रेलियात होणार लढत

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्या वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडणार आहे. रविवारी, १९ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. यापूर्वी सन २००३ मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनल झाली होती, त्यात ऑस्ट्रेलियानं बाजी मारली होती.

उद्याच्या फायनलसाठी रंगारंग कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण विमानांचा एअर शो देखील होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः फायनल पाहण्यासाठी हजेरी लावणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com