World Junior Weightlifting: ज्ञानेश्वरीची रौप्य पदकाची कमाई; देशाची मान उंचावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

world junior weightlifting championship india medal 2022

World Junior Weightlifting: ज्ञानेश्वरीची रौप्य पदकाची कमाई; देशाची मान उंचावली

हेराक्लिओन (ग्रीस) : सोमवारी पुण्याच्या हर्षदा गरुड हिने भारताला पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकून दिल्यानंतर येथे सुरू असलेल्या जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचा पदक धडाका कायम राहिला. मंगळवारी छत्तीसगडच्या ज्ञानेश्वरी यादव हिने रौप्यपदक पटकावले, तर देशबांधव व्ही. रितिकाने तिसरे स्थान मिळवून ब्राँझपदक पटकावताना महिलांच्या ४९ किलो वजनी गटात भारताला दुहेरी यश मिळवून दिले.(world junior weightlifting championship india medal)

ज्ञानेश्वरीने रौप्यपदक मिळवण्यासाठी एकूण १५६ किलो (७३ किलो + ८३ किलो) वजन उचलण्याची किमया साधली; तर दुसरीकडे १८ वर्षीय रितिकाने देशबांधव ज्ञानेश्वरीपेक्षा सहा किलो कमी असे एकूण १५० किलो (६९ किलो + ८१ किलो) वजन उचलताना भारताचे या स्पर्धेतील तिसरे पदक सुनिश्चित केले. टोकियो ऑलिंपिकची ब्राँझपदक विजेत्या इंडोनेशियाच्या विंडी कॅंटिका आयसा हिने एकूण १८५ किलो (८३ किलो+१०२ किलो) असे वजन उचलताना या प्रकारात विजेतेपदाचा मुकुट पटकावला.

तरी या प्रकारामध्ये चीन, उत्तर कोरिया आणि थायलंड या देशांचे पॉवरलिफ्टर गायब होते. चीनच्या जियांग हुर्इहुआच्या नावावर याच श्रेणीत एकूण २०६ किलो (९२ किलो + ११४ किलो) वजन उचलण्याचा विश्वविक्रम आहे. याच ४९ किलो वजन गटात मीराबाई चानूने टोकियो ऑलिंपिकमध्ये २०२ किलो (८७ किलो + ११५ किलो) वजन उचलून रौप्यपदक जिंकले होते. चानूच्या नावावर सीनियर ‘क्लीन ॲण्ड जर्क’ या प्रकारात जागतिक विक्रमदेखील आहे.

Web Title: World Junior Weightlifting Championship India Medal 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top