
फायनलमध्ये जागा निश्चित करण्यासाठी भारत (430 गुण, 71.7 टक्के), न्यूझीलंड (420 गुण, 70 टक्के), ऑस्ट्रेलिया (332 गुण, 69.2 टक्के) यांच्यात काट्याची टक्कर आहे.
नवी दिल्ली- आयपीएल सामन्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना आठ दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे लंडनमध्ये हा सामना आता 18 जूनपासून खेळवला जाणार आहे. आधी ही चॅम्पियनशीप 10 जून रोजी ऐतिहासिक लॉडर्सवर खेळली जाणार होती. आयपीएलचा अंतिम सामनाही याच तारखेच्या जवळपास होणार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेळाडूंच्या विलगीकरणावरुन स्थिती कठीण होऊ शकते.
बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्याने 'पीटीआय-भाषा'ने म्हटले की, डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना आता 18 ते 22 जून दरम्यान खेळला जाईल आणि 23 जून हा राखीव दिवस असेल. ही तारीख थोडीशी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएल संपल्यानंतर सामन्यासाठी आवश्यक विलगीकरणाच्या प्रक्रियेत कोणतीच अडचण येणार नाही.
हेही वाचा- Republic Day: टीम इंडियाने 26 जानेवारीला किती सामने खेळले आणि किती जिंकले?
आयपीएलचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु, ही स्पर्धा मेच्या अखेरीस संपण्याची शक्यता आहे. फायनलमध्ये जागा निश्चित करण्यासाठी भारत (430 गुण, 71.7 टक्के), न्यूझीलंड (420 गुण, 70 टक्के), ऑस्ट्रेलिया (332 गुण, 69.2 टक्के) यांच्यात काट्याची टक्कर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर भारतीय टीम पहिल्या क्रमांकावर आहे.
चुरशीची स्पर्धा
श्रीलंकेला त्यांच्या देशात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पराभूत केल्यानंतर इंग्लंड आयसीसी डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जवळ पोहोचला आहे. इंग्लंड अद्याप चौथ्या क्रमांकावर आहे. भारत 71.7 टक्क्यांसह सर्वोच्च स्थानी कायम आहे तर न्यूझीलंड 70.0 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा- मिशन एव्हरेस्ट! हाती तिरंगा घेवून करवीरकन्या पुन्हा सज्ज; मुलीच्या जिद्दीसाठी बापाची धडपड
इंग्लंडचे आता 68.7 टक्के गुण आहे आणि ऑस्ट्रेलियापेक्षा ते केवळ 0.5 टक्के अंकानी पिछाडीवर आहेत. ऑस्ट्रेलियाचे 69.2 टक्के अंक आहेत. आयसीसीने टि्वट करताना म्हटले की, श्रीलंकेवर 2-0 विजयानंतर इंग्लंड आता आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीप गुणतालिकेत ऑस्ट्रेलियापेक्षा 0.5 टक्के अंकानी मागे आहे.