
WTC Point Table : ऑस्ट्रेलिया-श्रीलंका बरोबरीत; टीम इंडियाचं स्टेटस काय?
World Test Championship Points Table : अॅशेस मालिकेतील सलग दुसऱ्या विजयासह ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेला तगडी फाइट देताना दिसतोय. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातल अॅडलेड कसोटीतील निकालानंतर ऑस्ट्रेलियाने 100 टक्के विनिंग पर्सेंटेजसह दुसऱ्या स्थानावर आहेत. श्रीलंकेनं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकून World Test Championship Points Table मध्ये अव्वलस्थान पटकावले आहे. त्यांच्या खात्यात 24 गुण आहेत.
ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील पहिल्या दोन सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर सुरु असलेल्या प्रतिष्ठित कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पुढचा कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला नंबर बन बनण्याची संधी आहे.
हेही वाचा: Premier League: मँचेस्टर सिटी टॉपवर; सर्वाधिक सामने जिंकण्याचाही केला विक्रम
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानच्या संघाने दोन कसोटी मालिकेत एकूण 3 सामने जिंकले असून एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 75 विनिंग पर्सेंटेजसह पाकिस्तान संघाच्या खात्यात 36 गुण आहेत.
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली कसोटी मालिका खेळली होती. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील भारताचा एक कसोटी मालिका पुढील वर्षात खेळवण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघ तीन सामन्यातील विजय, दोन अनिर्णित सामने आणि एका पराभवासह 58.33 पर्सेंटेजसह 42 गुण मिळवून चौथ्या स्थानावर आहे.
हेही वाचा: भल्या भल्यांना जमलं नाही ते श्रीकांतनं करून दाखवलं
वेस्ट इंडीज संघाने दोन कसोटी मालिकेत केवळ एक सामना जिंकला असून 3 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या खात्यात 12 गुण असून 25 विनिंग पर्सेंटेजह ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. पहिली वहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकलेल्या न्यूझीलंडच्या संघाने भारत दौऱ्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात केली. दोन कसोटी सामन्यापैकी एक सामना गमावून एक सामना त्यांनी अनिर्णित राखला. 4 गुण आणि 16 विनिंग पर्सेंटेजसह ते सहाव्या स्थानावर आहेत.
भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली मालिका खेळणारा इंग्लंडचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. भारता विरुद्धच्या मालिकेत त्यांनी एक सामना जिंकला होता तर एक सामना अनिर्णित राहिला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांना दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाशिवाय वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल झालेल्या कारवाईमुळे त्यांच्या खात्यात केवळ 8.33 विनिंग पर्सेंटेजसह 6 गुण जमा आहेत. बांगलादेशच्या संघाने एक कसोटी मालिका खेळली असून दोन सामन्यांच्या मालिकेत त्यांना श्रीलंकने व्हाइट वॉश दिला. परिणामी ते अद्याप गुणाचे खातेही न उघडता आठव्या क्रमांकावर आहेत.
Web Title: World Test Championship Points Table Australia Second After Srilanka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..