WPL: 4,4,4,4,4,4,4 पहिल्या सामन्यात कॅप्टन कौरचा धमाका! बॅक टू बॅक 7 चौकार अन् ठोकले अर्धशतक

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग स्पर्धेचा श्रीगणेशा केला दणक्यात...
  harmanpreet kaur hit-7-consecutive-boundary in womens premier league
harmanpreet kaur hit-7-consecutive-boundary in womens premier league

WPL 2023 harmanpreet kaur : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग स्पर्धेचा श्रीगणेशा दणक्यात केला. गुजरात जायंट्स संघाचा १४३ धावांनी पराभव करून आपली ताकद दाखवली.

मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने भारताच्या महिला प्रीमियर लीग हंगाम-१ च्या पहिल्याच सामन्यात इतिहास रचला आहे. गुजरात जायंट्सविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरने पाठीमागे सात चौकार मारले. या शानदार कामगिरीच्या जोरावर हरमनप्रीत कौरने 216 च्या स्ट्राईक रेटने खेळताना 65 धावा ठोकल्या.

  harmanpreet kaur hit-7-consecutive-boundary in womens premier league
WPL 2023 GG vs MI : पहिले येण्याचे भाग्य! कोणी मारला पहिला षटकार, कोणी घेतली पहिली विकेट जाणून घ्या एका क्लिकवर

हरमनप्रीत कौरने तिच्या डावात 30 चेंडू खेळल्या. यादरम्यान त्याने 14 चौकार मारले. म्हणजेच 65 पैकी 56 धावा केवळ चौकारांच्या जोरावर केल्या. 15 व्या षटकात हरमनप्रीत कौरने प्रथम मौनिका पटेलचे षटक फोडण्यास सुरुवात केली. या षटकातील तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर त्याने चौकार मारला. यानंतर कौर पुन्हा एकदा नव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर आली.

  harmanpreet kaur hit-7-consecutive-boundary in womens premier league
Harmanpreet Kaur : 14 चेंडूत 56 धावा; हरमनचा पहिल्याच सामन्यात अर्धशतकी कारनामा!

आयपीएलमधील सर्वात श्रीमंत विदेशी क्रिकेटर अॅशले गार्डनर ही ओव्हर टाकत होती. या षटकातील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर हरमनप्रीत कौरने चौकार लगावला. हरमनप्रीत कौरच्या शानदार कामगिरीशिवाय सलामीवीर हेली मॅथ्यूजने मुंबई इंडियन्सकडून 31 चेंडूत 47 धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाज एमिलिया केरने 187 च्या स्ट्राईक रेटने 24 चेंडूत 45 धावा ठोकल्या. या शानदार कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 207 धावा केल्या. त्यानंतर गुजरात संघाला 15.1 षटकांत 9 बाद 64धावांवर रोखले.

गुजरात संघातही नावाजलेल्या परदेशी खेळाडू आहेत, परंतु तिसऱ्याच चेंडूवर कर्णधार बेथ मूनीचा गुडघा दुखावला त्यामुळे तिला जखमी निवृत्त व्हावे लागले. त्यानंतर हर्लिन देओल आणि ऑस्ट्रेलियाचा अंशले गार्डनर भोपळाही फोडू शकल्या नाहीत तेथूनच गुजरात संघाची घसरगुंडी सुरू झाली. नवव्या षटकापर्यंत त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठला आली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com