UP Warriors vs Gujarat Giants Match Preview
esakal
UP Warriors face Gujarat Giants in WPL 2026 today : महिला प्रीमियर लीगमध्ये आज यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात लढत होत आहे. गेल्या मोसमात दोन्ही संघांची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नव्हती, त्यामुळे यंदा विजयी सुरुवात करण्यास दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. पहिल्या दोन हंगामांत यूपी वॉरियर्सला तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहावे लागले होते. त्यामुळे यंदा कर्णधार बदलला असून ऑस्ट्रेलियाची माजी विश्वविजेती कर्णधार मेग लेनिंगवर त्यांनी भरवसा ठेवला आहे.