WPL Mascot Shakti : निळ्या जर्सीतील वाघिणीचा Video पाहिलात का? जय शहांनी केलं 'शक्ती'चं अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WPL Mascot Shakti

WPL Mascot Shakti : निळ्या जर्सीतील वाघिणीचा Video पाहिलात का? जय शहांनी केलं 'शक्ती'चं अनावरण

WPL Mascot Shakti : वुमन्स प्रीमियर लीग 2023 च्या पहिल्या हंगामाचा नारळ हा 4 मार्चला मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर फुटणार आहे. त्यापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आज WPL च्या अधिकृत मॅस्कॉट शक्तीचे अनावरण केले. याबाबतचा व्हिडिओ जय शहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. शक्ती ही एक निळ्या जर्सीतील वाघीण आहे.

वुमन्स प्रीमियर लीग (Women's Premier League) च्या पहिल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि यूपी वॉरियर्स या पाच संघाचा समावेश आहे. पहिल्या हंगामाच्या लिलावात सर्व पाच संघांनी भारतातील युवा महिला क्रिकेटपटू आणि गुणवान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा योग्य समतोल राखला आहे.

WPL लीगचा पहिला सामना हा 4 मार्च रोजी डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. हा सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा हाय व्होल्टेज सामना हा अंबानी विरूद्ध अदानी असाही असणार आहे. कारण गुजरात जायंट्सच्या संघाची मालकी ही अदानींकडे आहे. WPL मध्ये 20 लीग सामने आणि दोन प्ले ऑफचे सामने होणार आहेत. ही स्पर्धा 23 दिवस चालणार आहे.

सामन्यांची वेळ ही आयपीएलसारखीच दुपारी 3.30 आणि सायंकाळी 7.30 अशी असणार आहे. ही स्पर्धा मुंबईच्या डी. वाय. पाटील आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहेत. साखळी फेरीतील अंतिम सामना हा यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 21 मार्चला ब्रेबॉर्न स्टेडियमवर होईल. तर एलिमिनेटर सामना 24 मार्चला डी. वाय. पाटील स्टेडियमवर आणि फायनल हा 26 मार्चला ब्रेबॉर्नवर होणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...