Ravindra Jadeja IPL 2023 : रविंद्र जडेजा संपूर्ण हंगाम नाही खेळणार, BCCI ने फ्रेंचायजींना स्पष्टच सांगितलं

Ravindra Jadeja IPL 2023
Ravindra Jadeja IPL 2023 esakal

Ravindra Jadeja IPL 2023 : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीतून सावरण्याचे नाव घेत नाहीये. बुमराहची दुखापत इतकी बळावली आहे की तो आता आयपीएलबरोबरच WTC च्या संभाव्य फायनलला देखील मुकला आहे. त्याच्यावर आता शस्त्रक्रिया होणार आहे.

जसप्रीत बुमराहच्या नसण्याने भारताला ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकपमध्ये मोठा फटका बसला होता. आता या प्रकरणात हात पोळून घेतलेल्या बीसीसीआयने यंदाच्या आयपीएल हंगामासाठी कडक वर्कलोड मॅनेजमेंट राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी बीसीसीआयने एनसीए आणि आयपीएल फ्रेंचायजींना यावर काम करण्यास सांगितले आहे. हे सर्व भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी सुरू होते.

Ravindra Jadeja IPL 2023
IND vs AUS : इंदूर कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला तर....! WTC फायनलमध्ये जाणार बाहेर?

आता मात्र भारतीय कसोटी संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोणातूनही या वर्कलोड मॅनेजमेंटकडे पाहत आहे. भारताचे अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यावर आयपीएलदरम्यान जास्त लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

याबाबत बोलताना बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला की, 'जे खेळाडू भारतातील वर्ल्डकप खेळण्याची शक्यता आहेत. त्यांच्यावर संपूर्ण आयपीएल बारीक लक्ष असणार आहे. सध्या ते खूप क्रिकेट खेळत आहेत. मात्र WTC च्या अंतिम सामन्याचा विचार करता, बुमराह नसताना वेगवान गोलंदाजीच्या विभागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.'

Ravindra Jadeja IPL 2023
Mitchell Starc : मानलं स्टार्क! डाव्या हाताचे बोट झालं रक्तबंबाळ तरीही देशासाठी लढतोय

'याचबरोबर रविंद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव जास्त आहे. म्हणूनच एनसीए चेन्नई सुपर किंग्जच्या सातत्याने संपर्कात राहून जडेजाच्या वर्कलोड मॅनजमेंटवर लक्ष ठेवणार आहे.' असंही हा अधिकारी म्हणाला.

बीसीसीआय अधिकारी म्हणाला की, यामगचा एकच उद्येश आहे. खेळाडूंना ताजेतवाने ठेवणे. आयपीएल ही हाय इंटेन्सिटी लीग आहे. त्यामुळे खेळाडूना दुखापतीपासून दूर ठेवणे कठिण आहे. मात्र आम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे करणे आणि त्यांना ताजेतवाने ठेवावे लागेल.'

(Sports Latest News)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com