WPL Auction 2023: पहिल्याच हंगामात WPLने दाखवून दिली PSLची गरिबी! बाबरवर भारी पडल्या तब्बल 15 महिला क्रिकेटर

बाबर आझमच्या पगाराच्या अडीच पटीने जास्त आणि...
WPL Auction 2023
WPL Auction 2023

WPL Auction 2023 : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या लिलावात खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा पाऊस पडला. 5 फ्रेंचायझी संघांनी 87 खेळाडूंवर एकूण 59.50 कोटी रुपये खर्च केले. या लिलावात 20 खेळाडू ज्यांना एक किंवा एक कोटींपेक्षा जास्त मिळाले. विशेष म्हणजे या 20 खेळाडूंपैकी 15 खेळाडूना पाकिस्तान सुपर लीगमध्ये सर्वात महागडा ठरलेल्या बाबर आझमपेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत.

WPL Auction 2023
PSL Opening: बिचारे पाकिस्तान! फटाके पण उडवता येत नाही, लागली स्टेडियममध्ये आग Video Viral

पाकिस्तान सुपर लीगमध्ये सर्वाधिक पैसे प्लॅटिनम श्रेणीतील खेळाडूंना दिला जातो. या श्रेणीतील खेळाडूंचा पगार $1.7 लाख म्हणजे 1.40 कोटी आहे. बाबर आझमसह शाहीन आफ्रिदी आणि रिझवान सारख्या अनेक बड्या खेळाडूंचा या श्रेणीत समावेश आहे. येथे पहिल्यांदाच महिला प्रीमियर लीगचा लिलाव झाला, तेव्हा 15 खेळाडूंच्या किमतीने पाकिस्तानच्या या प्लॅटिनम श्रेणीची कमाल मर्यादा ओलांडली.

स्मृती मानधना, ऍशले गार्डनर आणि नताली सिव्हर हे काही खेळाडू होते ज्यांच्या किंमती बाबर आझमच्या पगाराच्या अडीच पटीने जास्त होत्या. याबाबत सोशल मीडियावर मीम्सही बनवण्यात आले होते. महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम 4 मार्च ते 26 मार्च या कालावधीत होणार आहे, त्यानंतर आयपीएलची घोषणा होणे बाकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com