Wrestler Protest : ऑलिम्पिक पदक विजेत्या बॉक्सर विजेंदर सिंहला स्टेजवरून उतरवले खाली?

Wrestler Protest Boxer Vijender Singh
Wrestler Protest Boxer Vijender Singhesakal

Wrestler Protest Boxer Vijender Singh : ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासभेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतरमंतरवर गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. बृजभूषण सिंह यांच्यावर काही महिला कुस्तीपटूंनी लैंगिक आणि मानसिक शोषणाचा आरोप केला आहे.

दरम्यान, आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी भारताची ऑलिम्पिक पदक विजेता माजी बॉक्सर आणि काँग्रेस नेता विजेंदर सिंह पाठिंबा देण्यासाठी जंतरमंतरवर उपस्थित होता. मात्र एएनआयने दिलेल्या माहितीनुसार आंदोलक कुस्तीपटूंनी विजेंदरला स्टेजवरून खाली उतरण्यास सांगितले. आंदोलक कुस्तीपटूंना या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप नको आहे.

Wrestler Protest Boxer Vijender Singh
Ricky Ponting Rishabh Pant : पॉटिंगने पंतच्या IPL समावेशाबाबत केले मोठे वक्तव्य; जर तो आमच्यासोबत...

विजेंदर सिंहने 2008 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. त्याने कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, जंतरमंतरवर तो स्टेजवर नाही तर खाली जमिनीवर बसलेला दिसून येतो. विजेंदरने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

विजेंदर एएनआयशी बोलताना म्हणाला की, 'या कुस्तीपटूंना न्याय मिळावा इतकीच माझी इच्छा आहे. बृजभूषण यांच्यावरील आरोपांची काळजीपूर्वक चौकशी झाली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणात जे कोणी गुंतले आहेत त्यांची सीबीआयमार्फत चौकशी झाली पाहिजे.'

Wrestler Protest Boxer Vijender Singh
Online Fraud ICC : तुम्हा आम्हालाच नाही तर ICC लाही घातलाय ऑनलाईन गंडा; 20 कोटींना लागला चुना?

याचबरोबर विजेंदर सिंहने केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि कुस्ती फेडरेशनच्या अधिकाऱ्यांमध्ये काय संवाद झाला याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी त्याचे लाईव्ह रेकॉर्डिंग करण्याची मागणी केली. यामुळे सर्वांना या प्रकरणी कोणता निर्णय झाला याची माहिती मिळेल.

(Sports Latest Cricket)

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com