Wrestler Protest : कुस्तीपटू कामावर रुजू, आंदोलनही कायम, कुस्तीपटूंकडून स्पष्टीकरण; उलटसुलट चर्चांना विराम

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी भेट घेतल्यानंतर कुस्तीपटू आज आपापल्या नोकरीच्या ठिकाणी रुजू झाले.
wrestler protest sakshi malik bajrang punia vinesh phogat joined their duties
wrestler protest sakshi malik bajrang punia vinesh phogat joined their dutiessakal

नवी दिल्ली : राष्‍ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेले आंदोलन मागे घेतले नसल्याचा खुलासा कुस्तीपटूंनी केला आहे. यामुळे सोमवारी दिवसभर या कुस्तीपटूंचे आंदोलन बंद झाल्याबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी भेट घेतल्यानंतर कुस्तीपटू आज आपापल्या नोकरीच्या ठिकाणी रुजू झाले. मात्र, आंदोलन सुरुच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सात कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गुन्हे दाखल केले आहे.

यामध्ये एका अल्पवयीन मुलीने ‘पॉक्सो’अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्याचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी खासदार सिंह यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी ऑलिंपिकपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट व साक्षी मलिक आंदोलन करीत आहेत.

wrestler protest sakshi malik bajrang punia vinesh phogat joined their duties
Wrestler Protest Timeline : अमित शहांची भेट अन् कुस्तीपटू पुन्हा परतले सरकारी सेवेत; 138 दिवसात काय घडलं?

शनिवारी रात्री या कुस्तीपटूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर कुस्तीपटू आज कामावर रुजू झाले. काही माध्यमांमध्ये मात्र, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी आंदोलनातून माघार घेतली असून रेल्वेमध्ये ते आपल्या कामावर रुजू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. यामुळे आंदोलनच मागे घेतल्याची चर्चा सुरु झाली.

मात्र, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक या दोघांनी दुपारी या वृत्ताचे खंडन केले. साक्षी मलिक हिने ट्विट करून आंदोलन मागे घेतलेले नसल्याचे स्पष्ट केले. खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करावी, या मागणी आम्ही ठाम असून आंदोलन मागे घेतल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे साक्षी मलिकने स्पष्ट केले.

wrestler protest sakshi malik bajrang punia vinesh phogat joined their duties
Wrestlers Protest Sakshi Malik : 'न्यायाच्या लढाईत आम्ही...' आंदोलनातून माघार घेण्याच्या वृत्तावर साक्षी मलिक काय म्हणाली?

नोकरीमध्ये माझ्यावर जबाबदारी असून प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी मी रुजू झाले आहे. मात्र, अहिंसक पद्धतीने आंदोलन सुरु ठेवण्याबाबत आम्ही धोरण आखत आहोत, असेही साक्षीने सांगितले. बजरंग पुनियानेही, कामावर रुजू झालो असलो तरी आंदोलनातून माघार घेतली नसल्याचे स्पष्ट केले.

नोकरीसाठी आंदोलनातून माघार घेणार नाही, असेही पुनियाने सांगितले. यासंदर्भात या आंदोलनाची प्रसार माध्यमांची बाजू सांभाळणारे मनदीप सिंग यांनी ‘सकाळ’शी बोलताना आंदोलन पूर्ववत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.

‘उसी मकाम से अपना रास्ता होगा’

कुस्तीपटू विनेश फोगाट हिनेही आंदोलन संपल्याची अफवा पसरविणाऱ्यांना फटकारले आहे. ‘महिला कुस्तीपटूंना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय, त्याची अफवा पसरविणाऱ्यांना कल्पना तरी आहे का?

गुंडांसमोर कमजोर माध्यमांचे पाय डगमगतील; महिला कुस्तीपटूंचे नाही,’ असे ट्विट तिने केले. तसेच, ‘जहां पहूँच के कदम डगमगाए है सब के, उसी मुकाम से अब अपना रास्ता होगा,’ अशा प्रसिद्ध ओळीही तिने ट्विट केल्या. पदकांची तुलना पैशांबरोबर करणाऱ्यांवरही विनेश हिने टीका केली.

‘आमच्या पदकांची १५ रुपये अशी किंमत करणारे आता आमच्या नोकरीच्या मागे लागले आहेत. आमचे आयुष्य पणाला लागले आहे, त्यासमोर नोकरी ही फार छोटी बाब आहे. न्याय मिळण्यात नोकरीचा अडथळा येत असेल, तर अशी नोकरी सोडण्यासाठी आम्हाला दहा सेकंदही लागणार नाहीत. आम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नका,’ असा इशाराही तिने दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com