Reetika Hooda: आशियाई विजेती रितिका निलंबित; चाचणीत दोषी, राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेचा निर्णय
Indian Wrestler : २३ वर्षांखालील जागतिक विजेती आणि आशियाई स्पर्धेतील रौप्यविजेती कुस्तीपटू रितिका हूडा हिला उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. नाडाने ही कारवाई केली असून भारतासाठी ही मोठी प्रतिमा हानी मानली जाते.
नवी दिल्ली : आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारी आणि २३ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत विजेती ठरलेली कुस्ती खेळाडू रितिका हुडा हिला चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.