Wrestlers Protest Bajrang Punia Video
Wrestlers Protest Bajrang Punia Video

Wrestlers Protest: "त्या अफवेवर विश्वास ठेवू नका', बजरंग पुनियाचा हात जोडलेला व्हिडिओ व्हायरल

Wrestlers Protest Bajrang Punia Video : कुस्तीपटू आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यात सुरू असलेल्या वादाला सोमवारी नवे वळण मिळाले. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या अल्पवयीन कुस्तीपटूने आपले आरोप मागे घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिवसभर सुरूच होती. दरम्यान, मुलीच्या वडिलांचे अधिकृत वक्तव्यही समोर आलेले नाही.

Wrestlers Protest Bajrang Punia Video
IND vs AUS: टीम इंडियासाठी वाईट बातमी! WTC Finalच्या आधी आलेल्या 'त्या' फोटोनंतर वाढल टेन्शन

एकीकडे ही बातमी सुरू असतानाच दुसरीकडे बजरंग पुनियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करून लोकांना अफवांवर लक्ष देऊ नका असे आवाहन केले आहे. आंदोलन सुरू आहे, आता कोणीही एफआयआर मागे घेत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

तो म्हणाला, 'खेळाडूंबाबत आलेल्या बातम्यांचे खंडन करण्यासाठी मी आलो आहे. ना खेळाडूंमध्ये मतभेद झाले आहेत ना कोणत्याही खेळाडूने एफआयआर मागे घेतला आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत आणि जोरदार लढत आहोत. आमच्या समर्थकांची दिशाभूल करण्यासाठी या अफवा पसरवल्या जात आहेत. मीडिया आपल्याबद्दल नकारात्मक गोष्टी दाखवत आहे.

Wrestlers Protest Bajrang Punia Video
WTC Final 2023 : भारत-ऑस्ट्रेलिया WTC अंतिम सामना होणार रद्द? मोठे अपडेट आले समोर

न्यायासाठी कुस्तीपटू नोकरी सोडण्याच्या तयारीत...

बजरंग पुनिया पुढे म्हणाला, 'आमच्या लढाईत नोकरी आली तर तीही सोडायला आम्ही तयार आहोत. सर्वस्व पणाला लावून आम्ही ही लढाई लढत आहोत. मुलींच्या मान-सन्मानासाठी हा लढा आहे. त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही लढाई लढत राहू. यापूर्वी विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनीही आंदोलनातून माघार घेतल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com