Wrestlers Protest : जंतर मंतरवरील 9 जूनचे खाप आंदोलन स्थगित; राकेश टिकैत म्हणाले कुस्तीपटू सरकारसोबत...

Wrestlers Protest Rakesh Tikait
Wrestlers Protest Rakesh Tikaitesakal

Wrestlers Protest Rakesh Tikait : भारतीय महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ भारतीय किसान युनियन आणि खाप पंचायत येत्या 9 जूनला जंतर - मंतरवर आंदोलन करणार होते. मात्र शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आज हे आंदोलन मागे घेतले असल्याचे सांगितले. राकेश टिकैत यांनी जर 9 जूनपर्यंत बृजभूषण यांना अटक झाली नाही तर खाप पंचायत आंदोलन करणार असा इशारा दिला होता. मात्र आता हे आंदोलन होणार नाहीये. हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. बजरंग पुनियाने देखील रविवारी महापंचायतीमध्ये शेतकरी आणि खाप पंचायतींना याबाबत निर्णय न घेण्याची विनंती केली होती.

Wrestlers Protest Rakesh Tikait
Virat Kohli Vs Shubman Gill : विराटची फलंदाजी सदोष, शुभमन गिल तर तेंडुलकरसारखा... माजी खेळाडूचं निरीक्षण

एबीपीने दिलेल्या बातमीनुसार राकेश टिकैत यांनी सांगितले की, 'आता कुस्तीपटूंची सरकार आणि गृहमंत्री यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. यांच्या सांगण्यावरून 9 जून रोजी जंतर मंतरवर होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. कुस्तीपटू येणाऱ्या काही दिवसात जी पुढची तारीख देतील त्यावेळी नक्कीच त्यांच्या समर्थनात उतरू.' बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक हे शनिवारी गृहमंत्री अमित शहा यांना भेटले होते. ही बैठक दोन तास चालली होती.

Wrestlers Protest Rakesh Tikait
Ravi Shastri Virat Kohli WTC : ऑस्ट्रेलियाविरूद्ध विराटची सकाळ वेगळीच असते... रवी शास्त्रींचा कांगारूंना इशारा

खेळाडू करणार महापंचायत

ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया अमित शहांशी भेट घेतल्यानंतर पुढच्या दिवशी सोनीपथ येथील मुंडलाना पंचायतीमध्ये पोहचला होता. त्यावेळी त्याने शेतकरी आणि खाप पंचायतींना संबोधित करताना सांगितले की, 'मी तुम्हाला विनंती करतो की आता कोणताही निर्णय घेऊ नका. लवकरच आम्ही सर्व क्रीडा संघटनांना एका मंचावर बोलवून एक मोठी पंचायत आयोजित करणार आहोत. महापंचायतीबाबत तीन ते चार दिवसात निर्णय घेतला जाईल. याबरोबरच सर्व पंचायतींना स्थान आणि वेळेबाबत देखील माहिती दिली जाईल.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com