WFI Election : भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीची तारीख ठरली; बृजभूषण यांचा मुलगा रिंगणात?

Wrestling Federation Of India Election
Wrestling Federation Of India Electionesakal

WFI Election : भारतीय कुस्ती महासंघाची अनेक दिवसांपासून लटकलेली निवडणूक अखेर होणार आहे. ही निवडणूक 12 ऑगस्टला होणार असून या निवडणुकीत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला सहभाग नोंदवता येणार नाहीये. निवडणूक अधिकारी न्यायमूर्ती एमएम कुमार यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे दोन्ही गटांना निवडणुकीत सहभागी होण्यास अपात्र ठरवले आहे. याबाबतची घोषणा आज शुक्रवारी करण्यात आली. (Wrestling Federation Of India Election)

Wrestling Federation Of India Election
West Indies Vs India 2nd Test Live : भारताची मोठ्या धावसंख्येकडे कूच

भारतीय कुस्ती महासंघाच्या प्रभारी समितीने सहा जुलै रोजी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महाराष्ट्र, हरियाणा, तेलंगाणा, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या राज्यांच्या संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर ही तारीख 11 जुलै करण्यात आली. मात्र गुवाहाटी उच्च न्यायालयाने आसाम कुस्ती परिषदेच्या याचिकेनंतर निवडणुकीवर स्थगिती आणली होती.

यामुळे 11 जुलैला देखील निवडणूक झाली नाही. आसाम कुस्ती परिषदेने निवडणूक प्रक्रियेत प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने WFI च्या निवडणुकीवर गुवाहाटी उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवली.

भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत आता 24 राज्य संघटनांचे मतदानाचे अधिकार असलेल्या 48 सदस्य असणार आहेत. विविध पंदांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 1 ऑगस्ट असणार आहे. या अर्जांची पडताळणी दोन ऑगस्टला केली जाईल. आणि उमेदवारांची यादी सात ऑगस्टला जाहीर केली जाईल. जर मतदानाची गरज भासली तर हे मतदान 12 ऑगस्टला होणार आहे. (Wrestler Protest)

Wrestling Federation Of India Election
Asia Cup 2023 : भारत - पाकिस्तान आशिया कप विजेतेपदासाठी भिडणार, जाणून घ्या कधी अन् कुठं पाहायचा सामना!

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगि शोषणाचे आरोप झाले आहेत. यानंतर क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या व्यवहारापासून दूर राहण्यास सांगितले होते. त्याचबरोबर दैनंदिन व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती देखील नियुक्त केली होती. (Brij Bhushan Sharan Singh)

दरम्यान, बृजभूषण यांच्याविरूद्ध दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. या प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयाने बृजभूषण यांना जामीन मंजूर केला आहे. बृजभूषण यांनी WFI चे अध्यक्ष म्हणून आपली 12 वर्षे पूर्ण केली आहे.

त्यामुळे ते आता निवडणूक लढवू शकत नाहीत. मात्र उत्तर प्रदेश कुस्ती संघाचे प्रमुख आणि बृजभूषण यांचा मुलगा करण WFI ची निवडणूक लढवतो की नाही हे पहावे लागले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com