Pooja Gehlot | 'माफी मागू नकोस...' नरेंद्र मोदी कुस्ती पटू पुजा गहलोतला असं का म्हणाले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wrestler Pooja Gehlot

'माफी मागू नकोस...' नरेंद्र मोदी कुस्ती पटू पुजा गहलोतला असं का म्हणाले?

भारताची कुस्तीपटू पूजा गेहलोत हिने कांस्यपदक जिंकले. फ्रीस्टाइल 50 किलो गटात त्याने कांस्यपदक जिंकले. पूजाने स्कॉटलंडच्या क्रिस्टेल लेमोफॅकचा 12-2 असा पराभव केला. कुस्तीतील भारताचे हे सातवे पदक आहे. पुजाच्या या कामगिरीवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, पुजा तिच्या कामगिरीवर नाराज आहे. सुवर्णपदक हुकल्याने तिला अश्रु अनावर झाले. तिने रडत सर्व देशवासियांची माफी मागितली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत तिला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.

या सामन्यानंतर पुजाने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिला अश्रु अनावर झाले. "मी हरलो, हे खूप दुःखद आहे. मी देशवासीयांची माफी मागतो. मला येथे राष्ट्रगीत वाजवण्याची अपेक्षा होती, पण हरलो. मला आता फक्त कांस्यपदक मिळाले आहे. मी माझ्या चुकांवर काम करेन." अशी भावना पुजाने व्यक्त केली.

तिच्या या माफीनाम्यानंतर, नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत तिला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. "पूजा, तुझे पदक सेलिब्रेशनचे आवाहन करते, माफीचे नाही. तुझ्या आयुष्याचा प्रवास आम्हाला प्रेरणा देतो. तुझे यश आम्हाला आनंदी करते. तुझ्या नशिबात आणखी मोठ्या गोष्टी आहेत. तू नेहमी चमकत रहा." अशा आशयाचे ट्विट मोदी यांनी केले आहे.

इंग्लंडच्या बर्मिगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत सुरुवातीपासूनच पुजाने आपला दबदबा कायम ठेवला होता. स्कॉटलंडच्या क्रिस्टील लेमोफॅक लेचिडजिओला मात देत कास्यपदकाला गवसणी घातली होती. तिने क्रिस्टीलला अधिक डाव खेळूच दिले नाहीत. तसंच स्वत: खेळलेले डाव इतके दमदार होते की क्रिस्टीलला त्याचा सामना करता आला नाही. ज्यामुळे अखेर सामना पुजाने 12-2 च्या फरकाने जिंकत कांस्य पदकावर नाव कोरल.

Web Title: Wrestling In Commonwealth 2022 Pooja Gehlot Gets Emotional Post Winning A Bronze Medal Narendra Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :sportswrestling game