ऑलिंपिकसाठी कुस्तीची अशी असेल पात्रता

दिनेश गुंड
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

वरिष्ठ जागितक कुस्ती स्पर्धेतून 6, 
खंडांतर्गत पात्रता स्पर्धेतून 8 
जागितक ऑलिंपिक पात्रता स्पर्धेतून 2.
ऑलिंपिक स्पर्धेत फ्री-स्टाईल, ग्रिको रोमन आणि महिला मिळून एकूण 18 (प्रत्येकी 6) वजन गटात स्पर्धा होईल. प्रत्येक वजन गटात 16 म्हणजे एकूण 288 कुस्तीगीर ऑलिंपिकमध्ये सहभागी होतील. 

ऑलिंपिक स्पर्धेची उलट गणती सुरू झाली आहे. तशी खेळाडूंमध्ये ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची जिद्द वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आपण कुस्ती खेळासाठीच्या ऑलिंपिक पात्रतेची माहिती घेऊयात.

कुस्तीमध्ये पात्र ठरण्यासाठी मल्लांना सर्वप्रथम जागितक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतून संधी मिळेल. ही स्पर्धा १४ ते २२ सप्टेंबर दरम्यान कझाकस्तानमध्ये नूर सुलतान येथे पार पडणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सहा क्रमांकाचे कुस्तीगीर ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरतील. म्हणजेच सुवर्ण, रौप्य आणि ब्रॉंझपदक विजेत्यांबरोबर ब्रॉंझपदकाच्या लढतीत पराभूत झालेले दोघे असे एकूण पहिले सहा मल्ल. त्यानंतर विविध खंडात होणाऱ्या प्रत्येक खंडातंर्गत स्पर्धेतून प्रत्येकी दोन मल्ल (सुवर्ण, रौप्यपदक विजेते) पात्र ठरतील. यात आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका या खंडांचा समावेश आहे. 

मल्लांसाठी अखेरची आणि तिसरी संधी ही ऑलिंपिक पात्रता स्पर्धेतून असेल. यातूनही पहिले दोन म्हणजे सुवर्ण, रौप्यपदक विजेते मल्ल ऑलिंपिकला पात्र ठरतील.
म्हणजेच ऑलिंपिक स्पर्धेत प्रत्येक वजनी गटातून 16 मल्ल ऑलिंपिकसाठी पात्र ठरतील. 

ते असे - 
वरिष्ठ जागितक कुस्ती स्पर्धेतून 6, 
खंडांतर्गत पात्रता स्पर्धेतून 8 
जागितक ऑलिंपिक पात्रता स्पर्धेतून 2.
ऑलिंपिक स्पर्धेत फ्री-स्टाईल, ग्रिको रोमन आणि महिला मिळून एकूण 18 (प्रत्येकी 6) वजन गटात स्पर्धा होईल. प्रत्येक वजन गटात 16 म्हणजे एकूण 288 कुस्तीगीर ऑलिंपिकमध्ये सहभागी होतील. 

भारतीय मल्लांना पात्रतेची पहिली संधी सप्टेंबर महिन्यातील जागतिक कुस्ती स्पर्धेतून मिळेल.
त्यानंतर भारतीय मल्ल पात्रतेसाठी मार्च 2020 मध्ये होणाऱ्या आशियाई पात्रता स्पर्धेतून आपले नशीब अजमावतील. 
दुसऱ्या स्पर्धेतूनही पात्रतेची संधी हुकल्यास भारतीय मल्ल अखेरच्या जागतिक पात्रता स्पर्धेत खेळतील. ही स्पर्धा एप्रिल किंवा मे   2020 मध्ये होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wrestling qualification for Olympics