Wriddhiman Saha ला मिळाला 'बंग विभूषण' पुरस्कार, ममता बॅनर्जीचे मानले आभार

टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धीमान साहाला पश्चिम बंगाल सरकारने राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'बंग विभूषण' देऊन सन्मानित केले
Wriddhiman Saha
Wriddhiman Sahasakal

Wriddhiman Saha : टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धीमान साहाला पश्चिम बंगाल सरकारने राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'बंग विभूषण' देऊन सन्मानित केले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते साहाला सोमवारी कोलकाता येथे हा पुरस्कार देणात आला. समाजाच्या विविध क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल 'बंग विभूषण' सन्मान दिला जातो. महाश्वेता देवी, संध्या मुखर्जी, सुप्रिया देवी, मन्ना-डे या सेलिब्रिटींना हा सन्मान देण्यात आला आहे.

Wriddhiman Saha
IND vs PAK: भारतीय संघ बर्मिंगहॅमला पोहोचला, पाकिस्तानशी कधी भिडणार ते जाणून घ्या

साहाने या पुरस्कार दिल्याबद्दल पश्चिम बंगाल सरकारचे आणि ममता बॅनर्जी यांचे आभार मानले. आभार मध्ये साहाने लिहिले की, मी माननीय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बंगाल सरकार आणि प्रशासनाचा आभारी आहे, ज्यांनी या पुरस्कारासाठी माझ्या नावाचा विचार केला आहे. हे मिळाले याचा मला खरोखरच सन्मान आहे. मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.

Wriddhiman Saha
ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याची संधी वाढली!

भारतीय संघातून वृद्धिमान साहा सध्या बाहेर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळल्यानंतर तो प्रसिद्धीझोतात आला. साहाने ट्विटरवर व्हॉट्सअॅप संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर करून पत्रकाराकडून धमक्या मिळाल्याचा आरोप केला होता. साहाने लिहिले की, भारतीय क्रिकेटमधील माझ्या योगदानानंतर... मला एका तथाकथित प्रतिष्ठित पत्रकाराकडून मला अशा गोष्टींचा सामना करावा लागला. नंतर बीसीसीआयने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली. समितीच्या चौकशीअंती पत्रकार बोरिया मजुमदार यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली.

Wriddhiman Saha
Mithali Raj : मिताली राज 18 वर्षाच्या क्रिकेटपटूची फॅन

साहाने आतापर्यंत 40 कसोटी सामन्यांमध्ये 29.41 च्या सरासरीने 1353 धावा केल्या आहेत. साहाला नऊ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने 41 धावा केल्या. वृद्धिमान साहाचा आयपीएल रेकॉर्ड चांगले आहे. साहाने 144 आयपीएल सामन्यांमध्ये 25.28 च्या सरासरीने 2427 धावा केल्या आहेत ज्यात एक शतक आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. साहाने आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्ससह आयपीएल विजेतेपद पटकावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com