esakal | WTC INDvsNZ : रिझर्व्ह डे संदर्भात ICC ने घेतला मोठा निर्णय!
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ

WTC INDvsNZ : रिझर्व्ह डे संदर्भात ICC ने घेतला मोठा निर्णय!

sakal_logo
By
सुशांत जाधव

साउदम्पटन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मेगा फायनलला खराब हवामानाचा तडाखा बसलाय. पहिल्या दिवसाचा खेळ पावसाने वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी अंधूक प्रकाशामुळे जवळपास 25 षटकांचा खेळच होऊ शकला नव्हता. तिसऱ्या दिवशी वातावरणाने बऱ्यापैकी साथ दिली. पण चौथ्या दिवशी पुन्हा पावसाचा व्यत्यय आला. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) रिझर्व्ह डे संदर्भात मोठा निर्णय घेतलाय.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच दिवसांच्या मेगा फायनलसाठी आयसीसीने केवळ एक दिवस राखीव ठेवलाय. या दिवशी तिकीट दरात कपात करण्यात आलीये. पहिला दिवस पावसाने गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळ अर्धा तास लवकर सुरु करुनही केवळ 64.4 षटकांचा खेळ झाला होता. रविवारी देखील 76.3 षटकांचाच खेळ झाला. सोमवारी पावसामुळे पहिले सत्र वाया गेले. त्यामुळे आता राखीव दिवसाचा वापर होणार हे जवळपास निश्चित आहे.

हेही वाचा: WTC INDvsNZ : एकही चेंडू न खेळता झाला लंच टाईम!

आयसीसीच्या एका सूत्राने प्रसारमाध्यमांना दिलेल्या वृत्तानुसार, सध्याची परिस्थिती पाहता राखीव दिवसाचा वापर करावा लागणार आहे. राखीव दिवसाच्या सामन्यासाठी तिकीट दर कमी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी तीन गटात तिकीटांची वर्गवारी करण्यात आलीये. 150 GBP (जवळपास 15 हजार 444 रुपये), 100 GBP (10 हजार 296 रुपये) आणि 75 GBP (7 हजार 722 रुपये) अशी वर्गवारी करण्यात आलीये. सहाव्या दिवशी तिकीटांचा दर हा 100 GBP (10 हजार 296 रुपये), 75 GBP (7,722 रुपये) आणि 50 GBP (5 हजार 148 रुपये) इतका कमी करण्यात येणार आहे.

loading image