WTC Final 2023 Duke Ball : इंग्लंडमधील खेळपट्टी ऑस्ट्रेलियासारखी; त्यात ड्यूक बॉलची धास्ती?

WTC Final 2023 Duke Ball Challenges
WTC Final 2023 Duke Ball Challenges esakal

WTC Final 2023 Duke Ball Challenges : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC Final येत्या 7 जून पासून सुरू होत आहे. ही फायनल इंग्लंडच्या ओव्हलवर होणार आहे. ओव्हलची खेळपट्टी ही ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीसारखीच असते. त्यामुळे कांगारूंसाठी WTC Final ही घरच्या मैदानावरच खेळल्या सारखी आहे. मात्र तरी देखील ऑस्ट्रेलियासाठी एक बदल डोकेदुखी ठरू शकतो. हा सामना कूकाबुरा चेंडूवर नाही तर ड्यूक चेंडूवर खेळला जाईल. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ भारतासाठी देखील ही काही चांगली बाब नाही. कारण ड्यूक चेंडू हा वेगवान गोलंदाजांना चांगली मदत देतो.

WTC Final 2023 Duke Ball Challenges
Ashish Nehra IPL 2023 : नेहराच्या फुटबॉल स्टाईल कोचिंगमुळे गुजरात आयपीएल फायनल हरली?

ड्यूक चेंडूची शिवण असते वेगळी

कूकाबुरा चेंडूची शिवण ही मशीनवर होते. त्यामुळे ती सपाट असते. एसजीची शिवण ही हातावरची असते त्यामुळे ती चेंडूची सीम ही जाड दिसते. ड्यूक चेंडू देखील हातावरच शिवला जातो. मात्र यात थोडा फरक असतो. एसजीची शिवण ही मोठ्या धाग्याने केली जाते तर ड्यूक शिवण ही बारीक धाग्याने केली जाते. त्यामुळे गोलंदाजांना चांगली ग्रीप मिळते. ड्यूकच्या सीममध्ये गॅप असतो तर एसजीची शिवण जवळजवळ असते.

वेगावान गोलंदाजांना ड्यूकचा हात

ड्यूक बॉल हा वेगवान गोलंदाजांना साथ देतो कारण तो खूप वेळ स्विंग होतो. 50 ते 55 षटकापर्यंत ड्यूक बॉल स्विंग होतो. यामुळे फलंदाजाला चांगलीच अडचण निर्माण होते. यामुळेच इंग्लंडचे वेगवान गोलंदाज हे इतक्या विकेट्स घेत आहेत. एसजी फक्त 10 ते 15 षटकेच स्विंग होतो. त्यानंतर 70 षटकानंतर रिव्हर्स स्विंग व्हायला सुरूवात होते. कूकाबुरा 25 षटकेच स्विंग होतो. WTC Final ड्यूक चेंडूवर होणार असल्यामुळे जास्तकाळ वेगवान गोलंदाजच गोलंदाजी करतील. त्यात सीम फार मोठी नसल्याने फिरकीपटूंना देखील गोलंदाजी करताना अडचणी येतात.

WTC Final 2023 Duke Ball Challenges
WTC Final 2023 : भारत ICC Trophy का जिंकू शकला नाही, ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू म्हणाला, गुणवत्ता नाही तर...

दोन्ही संघाकडे स्विंग गोलंदाज

भारतीय आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे वेगवान गोलंदाजांचा चांगला चमू आहे. भारताकडे मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे. या सर्वांना ड्यूक बॉलवर चांगला स्विंग मिळेल. ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचं झालं तर पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांचा वेग हा भारतीय गोलंदाजांपेक्षा जास्त आहे. त्यात हे गोलंदाज स्विंग करण्यातही माहिर आहेत. याचा अर्थ जो संघ वेगवान मारा चांगल्या प्रकारे खेळेल त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याची संधी अधिक आहे.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com