WTC Final 2023 : भारत ICC Trophy का जिंकू शकला नाही, ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू म्हणाला, गुणवत्ता नाही तर...

WTC Final 2023 Matthew Hayden
WTC Final 2023 Matthew Haydenesakal

WTC Final 2023 Matthew Hayden : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 ची फायनल खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा WTC Final मध्ये पोहचला आहे. गेल्या फानयलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव करत पहिली वहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यामुळे भारताचे गेल्या दशकभरापासून अपुरे राहिलेले आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.

भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. मात्र तेव्हापासून भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयश येत आहे. भारत आयसीसी स्पर्धांमधील दबावाच्या सामन्यात कच खातोय.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या फायनलमध्ये पाकिस्तानने 2019 च्या वर्ल्डकप सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. नुकत्याच झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील भारताला सेमी फायनलमध्ये गाशा गुंडळावा लागला होता.

WTC Final 2023 Matthew Hayden
Ashish Nehra IPL 2023 : नेहराच्या फुटबॉल स्टाईल कोचिंगमुळे गुजरात आयपीएल फायनल हरली?

दोन वर्षापूर्वी झालेल्या WTC final मध्ये न्यूझीलंड विजेता तर भारत उपविजेता ठरला होता. आर्थिक आणि गुणवत्तेच्या बाबतीत भारत कुठेही कमी पडत नाहीये. या दोन्ही बाबतीत भारत एक पॉवर हाऊस आहे. मात्र विजेतेपदाचा विषय आला की भारताची पाटी गेल्या दशकभरापासून कोरीच आहे.

आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध ओव्हलमध्ये 7 जूनपासून सुरू होणाऱ्या WTC Final मध्ये भारतीय संघ हा दुष्काळ संपवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'भारतीय संघाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही शंका नाही. मात्र हा विषय संधी आणि मानसिकतेचा आहे. भारतात क्रिकेट हा श्वास आहे.'

WTC Final 2023 Matthew Hayden
Anil Kumble Ambati Rayudu : ती तर मोठी चूक... रायुडूने निवृत्ती घेताच कुंबळेने जखमेवर चोळले मीठ

हेडन पुढे म्हणाला की, 'ऑस्ट्रेलियात मी रस्त्यावरून आरामात जाऊ शकतो कोणी मला ओळखणार नाही. या दाढीत आणि हॅटमध्ये तर नाहीच! कारण ऑस्ट्रेलियात क्रिकेट सोबतच इतरही खेळ चांगलेच प्रसिद्ध आहेत. रग्बी, फुटबॉल, वॉटर स्पोर्ट्स, सर्फिंग, ऑऊट डोअर स्पोर्ट्स. मात्र भारतात फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंबाबतीत देखील हेच आहे.'

हेडनने भारतीय क्रिकेटपटूंना सल्ला दिला की, 'भारतीय क्रिकेटला माझा सल्ला आहे की काय निर्णय लागेल हे विसरून जा मात्र प्रक्रियेवर जास्त लक्ष केंद्रित करा.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com