WTC Final 2023 IND vs AUS : प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी... 'पाच' पथ्य पाळणार तोच WTC चॅम्पियन बनणार

WTC Final 2023 IND vs AUS Toss Pitch Of Oval
WTC Final 2023 IND vs AUS Toss Pitch Of Ovalesakal

WTC Final 2023 IND vs AUS Toss Pitch Of Oval : भारत आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी उद्यापासून (7 जून) इंग्लंडमधील ओव्हलवर एकमेकाना भिडणार आहेत. कागदावर पाहिले तर दोन्ही संघ तगडेच दिसतात. दोन्ही संघांचे फॉरमेशन देखील सारखेच आहे. त्यामुळे हा संघ उजवा आणि तो संघ डावा असं ठरवणं अवघड आहे.

विशेष म्हणजे सामना देखील त्रयस्थ ठिकाणी आहे अन् सामन्यासाठी वापरण्यात येणारा चेंडू देखील तिसऱ्याच देशातील आहे. यामुळे हा WTC फायनल सामना पाहताना मजा येणार आहे. ऑस्ट्रेलिया तर पहिल्यांदाच WTC Final मध्ये पोहचला आहे. भारताची ही सलग दुसरी फायनल आहे. गेल्या फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता.

यंदा भारताला तब्बल एक दशकाचा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवायचा आहे. त्यामुळे भारतावर दबाव तर नक्कीच असणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यात विजय मिळवण्यासाठी काही गोष्टींची पथ्य पाळावी लागणार आहेत.

WTC Final 2023 IND vs AUS Toss Pitch Of Oval
Rohit Sharma: 'प्रत्येक वेळी आठवण करून देण्याची गरज...' पत्रकारांच्या 'त्या' प्रश्नावर रोहित शर्मा भडकला

वेगवान गोलंदाजांची मोठी भुमिका

सामना इंग्लंडमध्ये असल्याने सामन्यात वेगवान गोलंदाजांची भुमिका ही मोठी असणार आहे. भारताकडे मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव अन् शार्दुल ठाकूर ही वेगवान गोलंदाजांची फळी आहे. आता सामन्यात रोहित शर्मा तीन वेगवान गोलंदाज, दोन फिरकीपटू खेळवणार की चार वेगवान गोलंदाज अन् एक फिरकीपटू खेळवणार हे सामन्यादिवशीच कळेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडे पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड या तगड्या वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.

खेळपट्टीचा विचार करता जरी ही खेळपट्टी दोन - तीन दिवसांनी फिरकीपटूंना साथ देणारी असली तरी WTC Final सामना हा जूनमध्ये होत आहे. इतिहासात पहिल्यांदाच ओव्हलवर जूनमध्ये सामना होत आहे. त्यामुळे खेळपट्टी फ्रेश असेल. त्याचा सहाजिकच फायदा हा वेगवान गोलंदाजांना होणार आहे.

खेळपट्टीची धाटणी ही ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीसारखीच असली तरी सामना कूकाबुरा चेंडूवर नाही तर ड्यूक चेंडूवर होणार आहे. त्यामुळे ज्या संघाच्या वेगवान गोलंदाजांनी चांगला मारा केला त्या संघाची सरशी होणार.

खेळपट्टीवर जास्त वेळ घालवा अन्...

ओव्हलवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचे वर्चस्व राहिले आहे. ओव्हलवर 104 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यातील नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 37 सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने 29 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. 37 सामने हे ड्रॉ झाले आहेत. नाणेफेक जिंकणारा संघ 36 वेळा तर नाणेफेक हरणारा संघ 30 वेळा जिंकला आहे.

ओव्हलवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याचा विचार केला तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांना दोन्ही डावात 200 धावांचा आकडा पार करता आलेला नाही. त्यामुळे फलंदाजी करताना जो संघ खेळपट्टीवर जास्त काळ टिकाव धरेल त्याला धावा करण्याची अन् पर्यायाने सामन्यावर पकड निर्माण करण्याची देखील चांगली संधी असेल.

सामन्याची सूत्र अष्टपैलूच्या हातात

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात हा कोणता संघ विरोधी संघाच्या वेगवान माऱ्याचा यशस्वी सामना करतो यावर जय पराजय ठरणार आहे. मात्र याचबरोबर या सामन्यात अष्टपैलू खेळाडूची देखील महत्वाची भुमिका असणार आहे. या सामन्यात एखाद्या संघाची फलंदाजी ढेपाळू शकते किंवा प्रमुख गोलंदाज निष्प्रभ ठरू शकतात. अशावेळी अष्टपैलू खेळाडू फक्त संघाला सावरू शकतो असं नाही तर त्याची चांगली कामगिरी ही संघाला विजय देखील मिळवून देऊ शकते.

भारताकडे वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू म्हणून शार्दुल ठाकूरचाच पर्याय उपलब्ध आहे. मात्र फिरकीमध्ये रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे दोन प्रमुख पर्याय आहेत. ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर त्यांची सर्व भिस्त ही कॅमरून ग्रीनवर असणार आहे.

WTC Final 2023 IND vs AUS Toss Pitch Of Oval
Virat Kohli Vs Shubman Gill : विराटची फलंदाजी सदोष, शुभमन गिल तर तेंडुलकरसारखा... माजी खेळाडूचं निरीक्षण

जो 'निवांत' तोच जिंकणार

भारताला गेल्या 10 वर्षात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर अनेकवेळा आयसीसी ट्रॉफीने भारातला थोडक्यात हुलकावणी दिली आहे. याचे दडपण भारतीय संघावर असणार आहे.

दुसरीकडे मोठ्या ब्रेकनंतर ऑस्ट्रेलिया कसोटी सामना खेळत आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभवाची धूळ चारली आहे. नुकत्याच भारतात झालेल्या मालिकेत देखील ऑस्ट्रेलिया भारताकडून पराभूत झाली. यामुळे त्यांच्यावरही दबाव असणार आहे. अशा परिस्थितीत जो संघ हा दबाव झुगारून देत सामना टेन्शन फ्री वातावरणात खेळेल त्याला नक्कीच फायदा होईल.

कॅचेस विन मॅचेस

इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजांची चांदी असते. त्यात जर ड्यूक बॉल हातात मिळाला तर त्यांचा आत्मविश्वास तर आकाशाला टेकलेला असतो. मात्र हाच ड्यूक बॉल आणि त्याचा तो भला मोठा स्विंग हा विकेटकिपर आणि स्लीपमध्ये फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंसाठी मोठी डोकेदुखी ठरतो.

इंग्लंडमधील कसोटी सामन्यात चेंडू हा वारंवार विकेटकिपर आणि स्लीपच्या दिशेने जात असतो. चेंडू जाताना सरळ जात नाही तर त्याच्यासोबत स्विंग देखील घेऊन जात असतो. इंग्लंडमध्ये चेंडू सीम होतो. म्हणजे टप्पा घेतल्यानंतर चेंडू विकेटकिपर पर्यंत स्विंग होतच जातो. यामुळे विकेटकिपर आणि स्लीपमधील खेळाडूंना डोळ्यात तेल घालून क्षेत्ररक्षण करावे लागते. एखादा जरी झेल सुटला तरी सामना हातून जाण्याची भिती असते.

गेल्या WTC Final मध्ये भारतीय संघाने मोक्याच्या क्षणी झेल सोडल्यामुळे भारताला मोठा फटका बसला होता. न्यूझीलंडने पहिल्या डावात महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. त्यामुळे यंदाच्या WTC Final मध्ये भारतीय संघाला फलंदाजी आणि गोलंदाजी पाठोपाठ क्षेत्ररक्षणही दर्जेदार करावं लागणार आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com