WTC Final IND vs AUS: WTC फायनलपूर्वी मोठा धक्का, वेगवान गोलंदाज संघातून बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WTC Final IND vs AUS

WTC Final IND vs AUS: WTC फायनलपूर्वी मोठा धक्का, वेगवान गोलंदाज संघातून बाहेर

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड रविवारी दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधून बाहेर पडला.ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी संघात हेजलवुडच्या जागी अष्टपैलू मायकेल नेसरचा समावेश केला आहे.

आयपीएल 2023 मध्येही उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे बाहेर पडला होता. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी त्याला तंदुरुस्त घोषित करण्यात आले. ३३ वर्षीय मायकेल नेसरने ऑस्ट्रेलियाकडून दोन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळले आहेत.तो अलीकडेच इंग्लिश कंट्री चॅम्पियनशिपमध्ये ग्लॅमॉर्गन साठी चांगला फॉर्ममध्ये आहे. त्याने ५ सामन्यात १ बळी घेतला आहे.

अंतिम फेरीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या वेगवान गोलंदाजासाठी नेसर आणि स्कॉट बोलँड यांच्यात लढत राहणार आहे. बोलँडने आपल्या देशासाठी फक्त सात कसोटी खेळल्या आहे. पण त्याने 13.42 च्या सरासरीने 28 बळी घेतले आहेत.

बर्मिंगहॅम येथे १६ जूनपासून सुरू होणाऱ्या आगामी अॅशेस मालिकेसाठी हेजलवूड पुनरागमन करेल अशी ऑस्ट्रेलियाला आशा आहे.

टॅग्स :WTC FinalICC WTC Final