WTC : के. एस. भारत, उमेश यादवला पसंती द्या - सरणदीप सिंग

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी सरणदीप सिंग यांचे मत
wtc final india vs australia K S bharat Umesh Yadav Sarandeep Singh cricket
wtc final india vs australia K S bharat Umesh Yadav Sarandeep Singh cricketsakal

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी यष्टीरक्षक म्हणून के.एस. भारत आणि वेगवान गोलंदाजीत उमेश यादवला अंतिम संघासाठी पसंती द्यावी, असे मत अखिल भारतीय निवड समितीचे माजी सदस्य सरणदीप सिंग यांनी व्यक्त केले आहे. इशान किशनला आत्ता जरी संधी मिळाली नाही तरी त्याचीही वेळ येईल.

फलंदाजीसाठी त्याचा मूळ क्रमांक सलामीचा आहे. कसोटीसाठी तो उपयुक्त नाही, असे मी म्हणणार नाही, त्याचे भवितव्य उज्ज्वल आहे; परंतु मर्यादित षटकांच्या खेळात सलामीला खेळणे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर खेळणे यात फरक पडतो, मर्यादित षटकांच्या प्रकारात तो पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करतो, त्याची अशी फलंदाजी इंग्लंडमध्ये उपयुक्त ठरू शकते; परंतु भारतकडेही फटक्यांची विविधता आहे, असे सरणदीप यांनी विश्लेषण केले.

दरम्यान, पंतच्या अनुपस्थितीत भारतीय संघात यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच सुरु आहे. इशान किशन, के.एस.भरत, संजू सॅमसन यांच्याकडे पर्यायी यष्टिरक्षक म्हणून बघितले जात आहे. तसेच दुखापतीमुळे बाहेर असलेला के.एल.राहुलही यष्टिरक्षक म्हणून उपयोगी येऊ शकतो.

wtc final india vs australia K S bharat Umesh Yadav Sarandeep Singh cricket
Pune Crime : ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाऊ आणि पुतण्याला सात वर्षे सक्तमजुरी

उमेशचा वेग महत्त्वाचा ठरेल

या सामन्यात मोहम्मद शमी आणि सिराज हे प्रमुख वेगवान गोलंदाज असतील; मात्र तिसरा वेगवान गोलंदाज निवडायचा झाल्यास शार्दुल ठाकूरऐवजी उमेश यादवला पसंती द्यावी. इंग्लिश वातावरणात त्याचा अतिरिक्त वेग महत्त्वाचा ठरू शकतो, शिवाय त्याच्याकडे रिव्हर्स स्विंग करण्याचीही क्षमता आहे, असे सरणदीप यांनी सुचवले आहे.

‘आयपीएल’मध्ये सर्वच फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी केलेली असल्यामुळे फलंदाजीची अडचण नसेल, मात्र इंग्लंडमधील वातावरण आव्हानात्मक असते आणि टी-२० मधून कसोटी क्रिकेटच्या झोनमध्ये येणे सोपे नसते. आपल्या फलंदाजांना मानसिकता बदलावी लागणार आहे. त्यातच मिशेल स्टार्क, पॅट कमिंस आणि हॅझलवूड यांच्या वेगवान माऱ्याचा सामना करणेही आव्हानात्मक असते, असे मत सरणदीप यांनी मांडले.

wtc final india vs australia K S bharat Umesh Yadav Sarandeep Singh cricket
CSK IPL 2023 : आमच्या कार्यकर्त्यामुळे CSK ने आयपीएल जिंकले.... तमिळनाडू BJP अध्यक्षांचं अजब वक्तव्य

आखूड टप्प्यावर चेंडू टाकण्यावर त्यांचा भर

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीबाबत बोलताना सरणदीप म्हणतात, ऑस्ट्रेलियन गोलंदाज चेंडू अधिक प्रमाणात स्विंग करत नाहीत. चेंडू जोरात आणि आखूड टप्प्याचा टाकण्यावर त्यांचा भर असतो आणि इंग्लिश वातावरणात भारतीयांना याचा फायदा होऊ शकेल. या वातावरणात फलंदाजांसमोर अडचणी निर्माण करायच्या असतील तर चेंडू स्विंग करणे आवश्यक असते.

भारतीय संघातील शुभमन गिल हा इंग्लंडमध्ये फारसे क्रिकेट खेळलेला नाही; परंतु ‘आयपीएल’मध्ये मिळवलेल्या फॉर्मचा त्याला येथे फायदा होईल.

- सरणदीप सिंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com