esakal | WTC Final मध्ये पावसाचीच बॅटिंग होणार? साउदम्प्टनमध्ये रात्रभर मुसळधार
sakal

बोलून बातमी शोधा

WTC Final मध्ये पावसाचीच बॅटिंग होणार? साउदम्प्टनमध्ये रात्रभर मुसळधार

भारत आणि न्यूझीलंड य़ांच्या साउदम्पटनमध्ये आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरु होणार आहे.

WTC Final मध्ये पावसाचीच बॅटिंग होणार? साउदम्प्टनमध्ये रात्रभर मुसळधार

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - भारत आणि न्यूझीलंड य़ांच्या साउदम्पटनमध्ये आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरु होणार आहे. जगातील पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यावर मात्र पावसाचं संकट आहे. साउदम्प्टनमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ सुरु होण्यास उशिर होण्याची शक्यता आहे. इंग्लडच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता सामना सुरु होईल. तर भारतात हा सामना दुपारी तीन वाजता सुरु होणार आहे.

साउदम्प्टनमधील वातावरणाकडे सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. साउदम्प्टनमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सामन्याच्या वेळेत हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने इंग्लंडमधील स्थानिक वेळेनुसार दुपारी एक वाजेपर्यंत पाऊस पडेल असं म्हटलं आहे. त्यामुळे पहिल्या सत्राचा खेळ वाया जाऊ शकतो. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात बाहेर पावसाचं वातावरण आणि जडेजा हॉटेलच्या रूममध्ये बसून कॉफी पित असल्याचं दिसतं.

हेही वाचा: नदालनंतर नाओमीची विम्बल्डनमधून माघार; ऑलिम्पिकमध्ये खेळणार

पुढच्या 24 तासात पावसाची ये जा सुरु राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. 18 जूनला साउदम्प्टनमध्ये 12 ते 16 अंश सेल्सिअस तापमान असणार आहे. दिवसभर हवा थंड राहील. पाचही दिवस कसोटी अशाच वातावरणात होईल. त्यामुळे पावसाची टांगती तलवार सामन्यावर कायम राहणार आहे.

कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी हवामना अनुकूल राहील. या दिवशी ऊन पडण्याची शक्यता व्यक्त केली असून 35 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पाचही दिवस ऊन पडण्याची शक्यता कमी आहे. पाऊस पडल्यास आउटफिल्ड कोरडं होण्यात अडचणी येऊ शकतात. तसंच फिरकीपटूंच्या तुलनेत वेगवान गोलंदाजांना फायदा होईल. भारताने संघात तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटू घेतले आहेत.

loading image