esakal | WTC Final : सिराजला प्लेइंग XI मध्ये संधी, दिग्गजाला डच्चू?
sakal

बोलून बातमी शोधा

mohammed-siraj

WTC Final : सिराजला प्लेइंग XI मध्ये संधी?

sakal_logo
By
नामदेव कुंभार

World Test Championship Final : विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (WTC) आठवड्यावर येऊन ठेपली आहे. 18 जून ते 22 जून 2021 यादरम्यान, न्यूझीलंड आणि भारत यांच्यामध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. आक्रमक विराट कोहलीसमोर संयमी केन विल्यमसनचं आव्हान आसणार आहे. या लढतीकडे संपूर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष लागलं आहे. दोन्ही संघ आपापले प्लॅन आखण्यात तयार करत असतील. सुत्रांच्या माहितीनुसार, विराट कोहली आणि रवी शास्त्री मोहम्मद सिराजला अंतिम सामन्यात खेळवण्यासाठी उत्सुक आहेत.

भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये वयक्तिक सराव करत आहे. शुक्रवारी संपूर्ण संघ एकत्र मैदानात उतरतील. त्यानंतर वेगवान गोलंदाजाचं ऑडिशन होणार आहे. अभ्याससत्रांमध्ये सर्वांचं लक्ष मोहम्मद सिराजवर असणार आहे. कारण, संघ व्यवस्थापन अंतिम सामन्यात सिराजला खेळवण्यास उत्सुक आहेत. सराव सत्रात सिराजनं फिटसेन सिद्ध केल्यास अंतिम सामन्याचं तिकिट मिळणार आहे. प्रसारमाध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद सिराजला इशांत शर्माच्या जागी संधी देण्यात येऊ शकते. पण हा खूप कठीण निर्णय आहे.

ऑगस्ट 2019 मधील वेस्टइंडीज दौऱ्यानंतर पहिल्यांदाज इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह सर्वजण उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांतील भारताच्या विदेशातील विजयांमध्ये या तीन प्रमुख गोलंदाजांचा महत्वाचा वाटा आहे. इशांत शर्माला इंग्लंडमध्ये 12 कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. 33 वर्षीय इशांत शर्मानं नुकतेच भारतामध्ये इंग्लंडविरोधात संघात पुनरागमन केलं होतं. इशांतचं वाढत वय आणि दुखापतीमुळे संघ व्यवस्थापन सावधानतेनं निर्णय घेत आहे. कारण इशांत शर्मा मोठे स्पेल टाकू शकेल का? हा प्रश्न त्यांना सतावत आहे. अशा परिस्थितीत सिराजला प्रधान्य देण्याचा विचार सुरु आहे. सिराजनं औस्ट्रेलिया दौऱ्यात प्रतिभा दाखवली होती. वेग आणि स्वींगचं मिश्रण करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणलं होतं.

जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी इशांत शर्मा आणि उमेश यादव भारताचे चारही प्रमुख गोलंदाज उपलब्ध आहेत. या चार गोलंदाजाशिवाय मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे दोन वेगवान आणि स्विंग गोलंदाजही उपलब्ध आहेत. त्यामुळे अंतिम 11 मध्ये कोणला संधी द्यायची? हा प्रश्न विराटपुढे आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचं संघातील स्थान कायम मानलं जात आहे. भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजासह उतरल्यास कोणाला संधी देणार? चार वेगवान गोलंदाजासह खेळण्याचा विराट कोहली विचार करत असेल तर शार्दुल ठाकूरचं स्थान पक्कं मानलं जातेय. कारण, शार्दुल ठाकूर तळाला फलंदाजी करु शकतो.

भारतीय संघ -( India's squad ): विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वाशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इंशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव.