रोनाल्डोचा ट्रेंड क्रिकेटपर्यंत पोहचला; पाहा व्हायरल व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indian fielding coach sridhar

रोनाल्डोचा ट्रेंड क्रिकेटपर्यंत पोहचला; पाहा व्हायरल व्हिडिओ

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल साउदम्टनच्या मैदानात सुरु आहे. पावसामुळे पहिला दिवस पाण्यात गेल्यावर दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झालीये. एका बाजूला दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु असताना दुसऱ्या बाजूला भारतीय संघाचे फिल्डिंग कोच आर श्रीधर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. श्रीधर यांनी रोनाल्डोची कॉपी करुन फुटबॉल जगतातील ट्रेंड क्रिकेटपर्यंत आणलाय, असेच काहीसे चित्र पाहायला मिळते. पहिल्या दिवशीचा खेळ पावसामुळे स्थगित झाल्याची घोषणा झाल्यानंतर आर श्रीधर हे प्रेस कॉन्फरन्समध्ये दिसले होते. (WTC Final Indian Fielding Coach Sridhar Copy Ronaldo Video Goes Viral)

या प्रेस कॉन्फरन्स दरम्यान त्यांनी रोनाल्डोची नक्कल केल्याचे पाहायला मिळाले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतोय. श्रीधर ज्यावेळी प्रेस कॉन्फरन्ससाठी आले त्यावेळी त्यांच्यासमोर टेबलावर कोका कोला आणि पाण्याच्या बॉटल्स ठेवलेल्या होत्या. या बाटल्या मी हटवू का? जर मी या बाटल्या हटवल्या तर याची किंमत किती होईल? अशा हटके अंदाजात त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये एन्ट्री मारली. माझ्यासाठी कोका कोलाच्या बाटल्या ठेवल्यात का? अशा मजेशीर अंदाजात त्यांनी रोनाल्डोच्या कृत्याची पुनरावृत्ती केली. हे सर्व गंमतीने केल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत.

रोनाल्डोने प्रकरण चांगलेच गाजलं

युरो कप स्पर्धेत हंगेरीच्या सामन्यापूर्वी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रोनाल्डोने टेबलावरील कोका कोलाच्या बाटल्या हटवल्या होत्या. या बाटल्या हटवताना सॉफ्ट ड्रिंकपेक्षा पाणी प्या, असा सल्लाही दिला होता. रोनाल्डोने केलेल्या कृत्यानंतर कोका कोला कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला होता. हा सिलसिला इथेच थांबला नाही. फ्रान्सचा स्टार फुलटबॉलपटू पॉल पोगबा यानेही प्रेस कॉन्फरन्समध्ये बियरची बोटल टेबलावरुन बाजूला केल्याचे पाहायला मिळाले. इटलीचा फुटबॉलर मॅन्युअल लोकातली यानेही असाच प्रकार केला. हा ट्रेंड क्रिकेटच्या प्रेस कॉन्फरन्समध्येही पाहायला मिळाले.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यापूर्वी फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी फुटबॉलच्या जगात चाललेल्या गोष्टीची केेलेली नक्कल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी ही गोष्ट गंमतीशीर अंदाजात केल्यानंतर याचीही चर्चा जोर धरु लागली आहे.

टॅग्स :WTC Final