esakal | WTC : आयो! अश्विनच्या बायकोचं ट्विट व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

prithi ashwin

WTC : आयो! अश्विनच्या बायकोचं ट्विट व्हायरल

sakal_logo
By
सुशांत जाधव

ICC World Test Championship Final : साउदम्टनच्या मैदानात पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम इंडियाचा पहिला डाव 217 धावांत आटोपला. कर्णधार विराट कोहली 44 धावा आणि उप-कर्णधार अजिंक्य रहाणेच्या 49 धावा करुन माघारी परतल्यानंतर रविंद्र जडेजा आणि अश्विन वगळता कोणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. आर अश्विनने 27 चेंडूत 22 धावांची खेळी केली. लो स्कोअरिंग मॅचमध्ये त्याच्या या धावा उपयुक्त ठरतील, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यात आणखी एक गोष्ट चर्चेचा विषय ठरतो ते म्हणजे अश्विनची पत्नी प्रिथी अश्विनने केलेले ट्विट.

रविचंद्रन जडेजाच्या साथीने अश्विवने भारतीय संघाच्या धावफलक 200 + पार केला. ही जोडी चांगली भागीदारी करुन बहुमुल्य धावांचे योगदान देईल, असे वाटत असताना साउदीने लॅथमकरवी अश्विनला झेलबाद केले. अश्विन बाद झाल्यानंतर प्रिथीने केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. आयो...या एका शब्दात प्रिथीने आपल्या मनातील भावना व्यक्त केली.

हेही वाचा: WTC: कोहलीच्या नावे 'विराट' विक्रम; धोनीला टाकले मागे

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून आर अश्विन गोलंदाजीसह फलंदाजीमध्येही टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण योगदान देताना पाहायला मिळते. त्याची 22 धावांची खेळी किती उपयुक्त ठरणार ते सामन्याच्या शेवटीच कळेल. पण सध्याच्या घडीला प्रिथीच्या ट्विटची चर्चा चांगलीच रंगली आहे. अश्विनची पत्नी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासूनच सोशल मीडियावर अधिक सक्रिय दिसली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलवेळी ती जरा अधिकच सक्रीय दिसते. टॉसची उत्सुकता, साउदम्टनमधील वातावरण आणि भारतीय संघाने 200 + धावा केल्यानंतर तिने ट्विटवरुन अपडेट्स दिल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: WTC : पूनम पांडेचं क्रिकेटसंदर्भात पुन्हा 'बोल्ड' वक्तव्य

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पहिला दिवस पावसाने गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. पहिल्या तीन विकेट गमावल्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं संघाला सावरले. पण तिसऱ्या दिवशी पुन्हा न्यूझीलंडची गोलंदाजी भार ठरली. टीम इंडिया सध्याच्या परिस्थितीत बॅकफूटवर आहे. न्यूझींडप्रमाणेच आता भारतीय गोलंदाजांना कमालीची कामगिरी करावी लागेल. यात अश्विनच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असेल. जलदगती गोलंदाजांना अनुकूल वाटत असलेल्या खेळपट्टीवर अश्विन कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

loading image
go to top