WTC Final शर्यत झाली रोमांचक! लंकेने वाढवली भारताची चिंता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wtc final sri lanka-need-9-wickets-to-win-on-the-last-day-vs-new-zealand-in 257 run to win 1st-test-team india in the final wtc cricket news kgm00

WTC Final शर्यत झाली रोमांचक! लंकेने वाढवली भारताची चिंता

New Zealand vs Sri lanka 1st Test : अँजेलो मॅथ्यूजने शानदार शतक झळकावून श्रीलंकेच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. श्रीलंकेचा संघ पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 302 धावा करू शकला. त्याने पहिल्या डावात 355 धावा केल्या होत्या. त्याचवेळी यजमान न्यूझीलंडने पहिल्या डावात 373 धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली. अशाप्रकारे किवी संघाला 285 धावांचे लक्ष्य मिळाले.

सोमवारी शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी आणखी 257 धावा करायच्या आहेत. त्याचवेळी श्रीलंकेचा संघ विजयापासून 9 विकेट दूर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी श्रीलंकेला मालिकेतील दोन्ही सामने जिंकावे लागतील. दुसरीकडे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी चौथी कसोटी किमान अनिर्णित राहावी अशी प्रार्थनाही त्याला करावी लागेल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या नंबर-1 वर आहे. तो फायनलसाठीही पात्र झाला आहे. भारतीय संघ 60.29 टक्के गुणांसह दुसऱ्या तर श्रीलंकेचा संघ 53.33 टक्के गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर अंतिम फेरीत पोहोचेल आणि श्रीलंका संघ बाहेर पडेल. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया जिंकेल किंवा सामना अनिर्णित राहील तेव्हाच श्रीलंकेच्या आशा कायम राहतील.

सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेने दुसऱ्या डावात 3 बाद 83 धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. अँजेलो मॅथ्यूज 20 आणि प्रभात जयसूर्या 2 धावांवर नाबाद होते. जयसूर्या 6 धावा करून बाद झाला. यानंतर मॅथ्यूज आणि दिनेश चंडिमल यांनी 5व्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत धावसंख्या 200 धावांपर्यंत पोहोचवली. चंडिमल 42 धावा करून बाद झाला. धनंजय डिसिल्वाने नाबाद 47 धावा केल्या. संपूर्ण संघ 105.3 षटकात 302 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. डावखुरा फलंदाज डेव्हॉन कॉनवे 5 धावा करून वेगवान गोलंदाज कसून राजिताचा बळी ठरला. 9 धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर टॉम लॅथम आणि केन विल्यमसन यांनी संघाला आणखी धक्का बसू दिला नाही. 17 षटकांनंतर धावसंख्या एका विकेटवर 28 धावा होती. शेवटच्या दिवशी संघाला आणखी 257 धावा करायच्या आहेत. म्हणजेच सामन्याचा निकाल निश्चित असल्याचे मानले जात आहे. लॅथम 11 आणि विल्यमसन 7 धावांवर खेळत आहे.