
राजगीर (बिहार) : खेलो इंडिया युवा स्पर्धेत दुसऱ्या दिवशीही वेटलिफ्टिंगमधील महाराष्ट्राचा सुवर्णपदकाचा धडाका कायम राहिला. सांगलीच्या यश खंडागळेने ६७ किलो गटात सुवर्ण‘यश’ मिळवित आजचा दिवस गाजविला. टेनिस एकेरीत महाराष्ट्राच्या अर्णव पापरकर, ऐश्वर्या जाधव यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे.