Yashasvi Jaiswal : जैस्वालचा डबल धमाका! आधी द्विशतक अन् नंतर शतक झळकावून रचला इतिहास

यशस्वी भव! पाणीपुरी विकायचा, क्रिकेटच्या मैदानात झळकावलं द्विशतक अन् शतक!
Irani Cup 2023 Yashasvi Jaiswal
Irani Cup 2023 Yashasvi Jaiswal

Irani Cup 2023 Yashasvi Jaiswal : कधी काळी पाणीपुरी विकणारा मुलगा आता क्रिकेटचे मैदान गाजवत आहे. मुंबईच्या या युवा फलंदाजानं इतिहास रचला आहे. हा 21 वर्षीय मुंबईचा फलंदाज जेव्हा जेव्हा क्रिजवर येतो तेव्हा त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतो. रणजी ट्रॉफीमध्ये अप्रतिम कामगिरी केल्यानंतर आता यशस्वी जैस्वालने इराणी चषकातही धमाका केला आहे.

ग्वाल्हेरमध्ये मध्य प्रदेशविरुद्धच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावल्यानंतर यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावातही शतक झळकावले. मोठी गोष्ट म्हणजे जैस्वालने हे शतक 100 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने केले.

Irani Cup 2023 Yashasvi Jaiswal
IND vs AUS: इंदूर खेळपट्टीची बाजू घेण्यासाठी गावसकर उतरले बॅट घेऊन, आयसीसीला दिले फटकार

इराणी चषकाच्या पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात शतक झळकावणारी यशस्वी जैस्वाल हा पहिली खेळाडू ठरला आहे. इराणी कपमध्ये 300 हून अधिक धावा करणारा यशस्वी दुसरा भारतीय आहे. यापूर्वी हा विक्रम शिखर धवनच्या नावावर होता. आता जयस्वालने त्याची बरोबरी केली आहे. जैस्वालने पहिल्या डावात 213 धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावातही शतक झळकावले आहे.

Irani Cup 2023 Yashasvi Jaiswal
IND vs AUS : हरभजनची मध्यस्थी आली कामी! अखेर जडेजा मांजरेकर वाद मिटला

दुसऱ्या डावात शेष भारताने कर्णधार मयंक अग्रवाल शून्यावर गमावला. बाबा इंद्रजितलाही खाते उघडता आले नाही. पहिल्या चेंडूवर यश धुलचीही आऊट झाला. मात्र यशस्वी धावांचा पाऊस पाडला. या डावखुऱ्या फलंदाजाने वेगाने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत ईश्वरनसोबत 102 धावांची भागीदारी केली. या दोन्ही खेळाडूंनी या सामन्यात 400 हून अधिक धावा जोडल्या आहेत. इराणी चषकाच्या सामन्यात हे प्रथमच घडले आहे. 2011 मध्ये शिखर धवन आणि अभिमन्यू मुकुंद यांनी 387 धावा जोडल्या होत्या.

Irani Cup 2023 Yashasvi Jaiswal
IND vs AUS : इंदूर कसोटीतील पराभवानंतर दिग्गज खेळाडूने विराटवर केले धक्कादायक विधान!

यशस्वी जैस्वाल ज्या प्रकारची कामगिरी करत आहे, तो दिवस दूर नाही जेव्हा ही खेळाडू लवकरच टीम इंडियामध्ये खेळल. जयस्वालने आतापर्यंत केवळ 15 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत ज्यात त्याने 9 शतके झळकावली आहेत. त्यापैकी ३ द्विशतके आहेत. जैस्वालची फलंदाजीची सरासरी 85 पेक्षा जास्त आहे. भारतीय कसोटी सलामीवीर सध्या ज्या प्रकारची कामगिरी करत आहे, ते पाहता यशस्वीला लवकरच टीम इंडियाकडून खेळू शकतो, असे दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com