Yoga | Olympics
Yoga | Olympics

Olympics: ऑलिम्पिकमध्येही योगासह होणार कबड्डी, खो-खोचाही समावेश? 'या' सहा खेळांसाठी भारताकडून होऊ शकते शिफारस

Olympics 2036: ऑलिम्पिकमध्ये योगासह आणखी सहा खेळांचा समावेश केला जावा, यासाठी भारताकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
Published on

Olympics 2036: जवळपास प्रत्येक खेळासाठी ऑलिम्पिक हे सर्वात मोठे स्टेज मानले जाते. आता ऑलिम्पिकमध्ये योगाचाही समावेश केला जाऊ शकतो. आणखी 12 वर्षांनी म्हणजेच 2036 साली योगाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये केला जावा यासाठी भारताकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे समजत आहे.

क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत मिशन ऑलिम्पिक सेलमध्ये योगासह सहा असे खेळ आहेत, ज्यांच्या ऑलिम्पिकमधील समावेशासाठी शिफारस केली जाऊ शकते. यामध्ये टी२० क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ, स्क्वॅश आणि खो-खो असे खेळ आहेत.

खरंतर याबद्दल गेल्याचवर्षी चर्चा करण्यात आली होती. तसेच यापूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते की 2036 ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी भारत उत्सुक आहे. त्यांनी मिशन ऑलिम्पिक सेलच्या बैठकीदरम्यान ही घोषणा केली होती.

Yoga | Olympics
T20 World Cup: W,W,W...कमिन्सचा राडा! सुपर-8 मधील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी घेतली हॅट्रिक, पाहा Video

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार 2036 ऑलिम्पिकसाठी शिफारशींच्या 6 पानी सारांशमध्ये अनेक सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये लैंगिक छळ प्रतिबंध आणि जागरुकता, सुरक्षित वातावरण, डोपिंगला आळा घालणे, तळागाळात लक्ष केंद्रित करणे, रेफ्री तयार करणे अशा अनेक गोष्टी आहेत.

तसेच 2036 च्या ऑलिम्पिकमध्ये नवीन खेळांच्या शिफारशीबाबतचे कामकाज एक वेगळी कमिटी पाहणार आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ऑलिम्पिकचे आयोजक असणाऱ्यांना एक किंवा अनेक खेळांचा त्यांच्या अंतर्गत स्पर्धेत समावेश करण्याची परवानगी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी (IOC) देते. पण त्यासाठी काही नियमही आहेत.

Yoga | Olympics
International Yoga Day 2024 : योगा करताना मॅटचा वापर करणे का गरजेचे आहे? जाणून घ्या एक्सपर्टकडून

दरम्यान, आयओसीच्या नुसार अनेकांनी 2036 ऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी रस दाखवला आहे. त्याआधी होणाऱ्या सर्व ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन निश्चित आहेत.

यंदा 2024 मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर 2028 ऑलिम्पिकचे आयोजक लॉस अँजलिस आहे, तर 2032 ऑलिम्पिक ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. तरी आता 2036 ऑलिम्पिकबाबत निर्णय घेण्यासाठी कमीत कमी 1-2 वर्षांचा कालावधी लागू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com