'धोनीसारखी घाण कायम संघात राहत नाही'

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जुलै 2019

माजी क्रिकेटपटू योगराजसिंग यांनी पुन्हा एकदा धोनीला लक्ष्य करताना त्याच्यावर टीका केली आहे. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून दोनवेळा डावलण्यात आल्याने अंबाती रायुडूने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता.

नवी दिल्ली : अंबाती रायुडू याने निवृत्ती घेण्यासाठी घाई केली. त्याने पुन्हा संघात यावे. कारण महेंद्रसिंह धोनीसारखी घाण संघात कायम राहत नाही, अशी विखारी टीका युवराजसिंगचे वडील योगराजसिंग यांनी केली आहे.

माजी क्रिकेटपटू योगराजसिंग यांनी पुन्हा एकदा धोनीला लक्ष्य करताना त्याच्यावर टीका केली आहे. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून दोनवेळा डावलण्यात आल्याने अंबाती रायुडूने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. रायुडू राखीव खेळाडूंमध्ये असूनही त्याला जखमी शिखऱ धवन, विजय शंकर याच्याजागी निवडण्यात आले नव्हते. योगराजसिंग यांनी याबाबत धोनीला जबाबदार धरले आहे.

योगराजसिंग म्हणाले, की रायुडू बाळा तू खूप गडबडीत निर्णय घेतला. निवृत्ती मागे घेऊन त्याने सिद्ध करून दाखवावे की तु कोण आहे. धोनीसारखे खेळाडू कायम संघात राहत नाहीत. कारण, घाण कायम राहत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yograj Singh attack on Mahendra Singh Dhoni