'माझं सुटलेलं पोट त्यावेळी का नाही दिसलं?'; लसिथ मलिंगाचा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसिथ मलिंगा

'माझं सुटलेलं पोट त्यावेळी का नाही दिसलं?'; मलिंगाचा सवाल

मलिंगा मार्च २०२० पासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे

कोलंबो: श्रीलंकन क्रिकेटमधील सर्वात भेदक मारा करणाऱ्या गोलंदाजांमध्ये वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचं नाव नक्कीच घेतलं जातं. केवळ वेगवानच नाही तर अचूक यॉर्करचा मारा करण्यामध्येही त्याचा कोणीही हात धरू शकलेलं नाही. श्रीलंका असो किंवा मुंबई इंडियन्स, दोन्ही संघांसाठी अनेक वेळा संकटाच्या काळात मलिंगा तारणाहार ठरला आहे. गेल्या काही महिन्यात कोरोनामुळे क्रिकेटचे काही मोजकेच सामने झाले. त्यात मलिंगाचा श्रीलंकेच्या संघात समावेश नव्हता. मार्च २०२० नंतर तो श्रीलंकेच्या संघातून खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहे. असे असतानाच त्याने मात्र एक महत्त्वाचं वक्तव्य करत या चर्चांना पूर्णविराम दिला. (Yorker King Lasith Malinga Angry says Nobody complained about my tummy or fitness that time)

हेही वाचा: विम्बल्डन सुरु असताना रंगली सचिन-विराट जोडीची चर्चा

"मी टी२० सामन्यात प्रभावीपणे २४ चेंडू नक्कीच टाकू शकतो. मी सामन्यात २०० चेंडूही टाकू शकतो. पण केवळ २ किमी धावण्याच्या फिटनेस टेस्टमुळे सध्या घरी बसलोय. कारण ती फिटनेस टेस्ट मी पास करू शकत नाही. २०१९ साली मी न्यूझीलंडच्या संघाचे कँडीच्या मैदानावर ४ चेंडूत ४ गडी बाद केले आणि डबल हॅटट्रिक घेतली. त्यावेळी मात्र माझं वाढलेलं पोट किंवा फिटनेसचा त्रास कोणालाच कसा दिसला नाही?", असा सवाल मलिंगाने टीकाकारांना विचारला.

हेही वाचा: लंकेच काही खरं नाही; इंग्लंडकडून वनडेतही खाल्ला सपाटून मार

लसिथ मलिंगाने ४ चेंडूत ४ बळी मिळवले तो क्षण

लसिथ मलिंगाने ४ चेंडूत ४ बळी मिळवले तो क्षण

"मी केवळ टी२० वर्ल्डकपचा विचार करतोय असं मूळीच नाही. मी सध्या असं सांगतोय की मी मूळीच निवृत्त होणार नाही. मला माझ्या गोलंदाजीवर पूर्ण विश्वास आहे. आजही मी महत्त्वाचे समजले जाणारे २४ चेंडू (टी२० तील ४ षटके) टाकू शकतो. श्रीलंकन खेळाडूंना फिटनेस सिद्ध करण्यासाठी २ किमी धावणं आवश्यक आहे. ते मला आता शक्य होत नसल्याने मी घरात थांबलो आहे. पण मी सलग दोन तास गोलंदाजी मात्र नक्कीच करू शकतो", असा दृढविश्वास मलिंगाने व्यक्त केला.

loading image
go to top