Syed Mushtaq Ali Trophy कोणी किती वेळा जिंकलीये माहितीये? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Syed Mushtaq Ali Trophy
Syed Mushtaq Ali Trophy कोणी किती वेळा जिंकलीये माहितीये?

Syed Mushtaq Ali Trophy कोणी किती वेळा जिंकलीये माहितीये?

sakal_logo
By
सुशांत जाधव

Syed Mushtaq Ali Trophy Winners list : देशांतर्गत क्रिकेटमधील लोकप्रिय टी-20 स्पर्धा 2007-08 पासून खेळवली जाते. पहिल्या स्पर्धेत तामिळनाडूनं पंजाबला पराभूत करत ट्रॉफी उंचावली होती. यंदाच्या 2021-22 च्या हंगामात पुन्हा एकदा त्यांनी बाजी मारत तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा विक्रम आपल्या नावे नोंदवला. दोन वेळा दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली स्पर्धा जिंकणाऱ्या तामिळनाडून यावेळी विजय शंकरच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा जेतेपद मिळवले.

कर्नाटक, बडोदा आणि गुजरात यांनी ही स्पर्धा दोन वेळा जिंकली आहे. गत हंगामात तामिळनाडूने दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली स्पर्धा जिंकली होती. सलग दुसऱ्यांदा तमिळनाडूला यश मिळाले. कर्नाटकने मनिष पांड्येच्या नेतृत्वाखाली 2018-19 आणि 2019-20 सलग दोन वेळा स्पर्धा जिंकली होती. पुन्हा एकदा मनिष पांड्येच्या नेतृत्वाखाली कर्नाटकला संधी होती. मात्र अखेरच्या क्षणी शाहरुख खानने त्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. जाणून घेऊयात आतापर्यंत कोणत्या संघाने कोणाच्या नेतृत्वाखाली जिंकलीये स्पर्धा...

हेही वाचा: Syed Mushtaq Ali Trophy : शाहरुखच्या सिक्सरनं तामिळनाडूला विक्रमी जेतेपद

Syed Mushtaq Ali Trophy Winners List

Seasons Winners Runners-up Captains

2006/07 तामिळनाडू पंजाब दिनेश कार्तिक

2009/10 महाराष्ट्र हैदराबाद रोहित मोटवानी

2010/11 बंगाल मध्यप्रदेश मनोज तिवारी

2011/12 बडोदा पंजाब पिनल शाह

2012/13 गुजरात पंजाब पृथ्वी पटेल

2013/14 बडोदा उत्तर प्रदेश आदित्य वाघमोडे

2014/15 गुजरात पंजाब मनप्रीत मुनेजा

2015/16 उत्तर प्रदेश बडोदा सुरेश रैना

2016/17 इस्ट झोन सेंट्रल झोन मनोज तिवारी

2017/18 दिल्ली राजस्थान प्रदीप संगवान

2018/19 कर्नाटक महाराष्ट्र मनिष पांडे

2019/20 कर्नाटक तामिळनाडू मनिष पांडे

2020/21 तामिळनाडू बडोदा दिनेश कार्तिक

2021 तामिळनाडू कर्नाटक विजय शंकर

loading image
go to top