मेस्सीच्या पॅकेजमधील Cryptocurrency चा फंडा माहितेय?

मेस्सी आणि पॅरिस सेंट जर्मनशी यांच्यातील करारानंतर क्रिप्टो स्वरुपातील फॅन टोकनची चर्चा सध्या क्रीडा वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
मेस्सीच्या पॅकेजमधील Cryptocurrency चा फंडा माहितेय?

स्पॅनिश क्लब बार्सिलोनासोबतचे नाते तुटल्यानंतर दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी पॅरिस सेंट जर्मनशी करारबद्ध झालाय. पॅरिस सेंट जर्मन क्लबने मेस्सीसाठी मोठी रक्कम मोजलीये. मेस्सीसाठी एखादा क्लब हे करणार यात काहीच आश्चर्य नाही. पण विशेष म्हणजे मेस्सीला दोन वर्षांच्या करारापोटी बोनस स्वरुपात जी रक्कम मिळालीये ती चक्क क्रिप्टो करन्सीच्या रुपात आहे. मेस्सी आणि पॅरिस सेंट जर्मनशी यांच्यातील करारानंतर क्रिप्टो स्वरुपातील फॅन टोकनची चर्चा सध्या क्रीडा वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

फ्रान्स क्लबने मेस्सीसाठी अतिरक्त बोनससह वर्षाला 41 मिलियन डॉलर आणि करारावेळी बोनस म्हणून जवळपास 30 मिलियन डॉलर इतकी रक्कम देऊ केलीये. मेस्सीला बार्सिलोनासोबत काय रहायचे होते. तो अर्ध्या पगारात क्लबसोबत राहण्यासही तयार होता. पण क्लबची आर्थिक परिस्थिती आणि ला लिगाच्या कठोर फेअर प्ले नियमामुळे मेस्सी अखेर बार्सिलोना क्लबपासून वेगळा झाला. अर्जेंटिनाच्या स्टार खेळाडूने फुटबॉल जगतातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या बलॉन डी ऑर पुरस्कारावर सहावेळा नाव कोरले आहे. पॅरिस सेंट जर्मनच्या ताफ्यात सहभागी होण्यासाठी या क्लबच्या फॅन टोकनचाही वापर करण्यात आलाय.

मेस्सीच्या पॅकेजमधील Cryptocurrency चा फंडा माहितेय?
IND vs ENG: राहुलचा इंग्लंडला दणका! विरूच्या विक्रमाशी बरोबरी

फॅन टोकन म्हणजे नेमकं काय?

जानेवारी 2020 पासून क्रिप्टोकरन्सीला सुरुवात झालीये. व्हर्चुअल स्वरुपातील चलनाचा मेस्सीच्या पगारात वाटा असल्याने या माध्यमाला चालाना मिळेल, असे बोलले जात आहे. क्रिप्टो प्लॅटफॉर्मवरील Socios.com यांच्यासोबतच्या भागीदारीसह पीएसजीने क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून चाहत्यांकडून निधी गोळा केलाय. ही वेबसाईट ब्लॉकचेन सेवा पुरवणाऱ्या चिलिझ द्वारे चालविली जाते.

'फॅन टोकन'च्या माध्यमातून क्लबच्या मतदान प्रक्रियेत चाहत्यांना सहभागी होता येते. कोरोनाच्या काळात क्लबला याचा मोठ्या प्रमाणात फायदा झालाय. कोरोनाच्या संकटात फॅन टोकनच्या माध्यमातून फुटबॉल क्लबला जवळपास 200 मिलियनचे उत्पन्न पात्र झाले आहे. क्लब ब्रँडिंग आणि रणनितीसंदर्भात चाहत्यांचा डाटा गोळा करण्यासाठी फॅन टोकन या संकल्पनेचा वापर करण्यात येत आहे.

मेस्सीच्या पॅकेजमधील Cryptocurrency चा फंडा माहितेय?
VIDEO : KL राहुलनं सादर केला आदर; हिटमॅन रोहित म्हणाला चल रे!

PSG पहिला क्लब नाही ज्यांनी फॅन टोकनचा वापर केलाय

चाहत्यांकडून टोकनच्या माध्यमातून क्लबची रणनितीत उपयोग करणारी PSG हा पहिला क्लब नाही. सोशिओच्या वेबसाइटनुसार, यापूर्वी इटलीचा एसी मिलान, इंटर मिलान आणि इटलीमधील एएस रोमा, आर्सेनल, अॅस्टन व्हिला, इंग्लंडमधील मँचेस्टर सिटी, बार्सिलोना आणि स्पेनमधील अॅटलेटिको माद्रिद, अॅस्टन मार्टिन एफ 1 टीम, अल्फा रोमिओ रेसिंग टीम आणि अमेरिकेतील यूएफसी यांनी फॅन टोकनचा वापर करुन निधी जमा केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com