SA vs IND : राहुलच्या शतकाशिवाय ही गोष्टही राहिली चर्चेत

SA vs IND
SA vs INDTwitter

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या मैदानात रंगला आहे. कसोटी सामन्याचा पहिला दिवस लोकेश राहुलनं गाजवला. त्याच्या नाबाद शतकी खेळीशिवाय आणखी एक गोष्ट पहिल्या दिवशी चर्चेचा विषय ठरली. ती म्हणजे दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंनी आपल्या दंडावर बांधलेली काळी फित. (reason behind south african players wearing black armbands)

बॉक्सिंग डे कसोटीच्या (SA vs IND Boxing Day Test) पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला एक वाईट बातमी मिळाली. वर्णद्वेषाच्या मोहिमेत सक्रीय भाग घेऊन मोठी दरी दूर करण्यासाठी आहोरात्र झटणारे दक्षिण आफ्रिकेचे आर्चबिशप डेसमंड टूटू (Archbishop Desmond Tutu,) यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. टूटू यांचा शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. देशातील वर्णद्वेषाच्या लढ्यासाठी झटणाऱ्या व्यक्तीमत्वाला श्रद्धांजली वाहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील खेळाडू काळी फित बांधून मैदानात उतरल्याचे दिसले.

SA vs IND
आफ्रिकेत सेंच्युरी ठोकणारा KL राहुल ठरला दुसरा सलामीवीर

सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून संपूर्ण संघाने त्यांना श्रद्धांजली देखील वाहिल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलेल्या ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर मोहिमेला समर्थन देण्यासाठी संघातील खेळाडू गुडघ्यावर बसल्याचे दिसले.

SA vs IND
SA vs IND : कोहलीनं टॉस जिंकला, अजिंक्यसह लॉर्ड मुंबईकराला संधी

वर्णद्वेषाच्या मुद्यावरुन आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने मोठा वनवास भोगलाय. कित्येक वर्षे त्यांना क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते. ब्लॅक लाइव्हज मॅटर या मोहिमेच्या मुद्यावरुनही संघात मतभेद पाहायला मिळाले होते. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक क्विंटन डिकॉकने या मोहिमेअंतर्गत गुडघ्यावर बसायला नकार दिला होता. पण तोही या मोहिमेत आता सामील होताना दिसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com