युवा भारतीय तिरंदाजांचा आशियाई स्पर्धेत १० पदकांवर मोहोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Medals in Archery Competition

शारजा येथे झालेल्या आशियाई कनिष्ठ तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी १० पदक जिंकत पदकतालिकेत सर्वांत वरचे स्थान पटकावले आहे.

Archery Competition : युवा भारतीय तिरंदाजांचा आशियाई स्पर्धेत १० पदकांवर मोहोर

शारजा - येथे झालेल्या आशियाई कनिष्ठ तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी १० पदक जिंकत पदकतालिकेत सर्वांत वरचे स्थान पटकावले आहे. भारतीयांनी बलाढ्य अशा तैवान आणि कोरियाच्या संघाला मागे टाकत पदकतालिकेत १० पदकांसह अव्वल स्थान पटकावले आहे. भारताने पाच सुवर्ण, तीन रौप्य; तर दोन ब्राँझ पदकांवर आपले नाव कोरले आहे.

भारतीयांनी सर्वांत जास्त पदके कंपाऊंड विभागात मिळवली असून; या प्रकारात आठपैकी सात पदकांवर भारतीयांनी नाव कोरले आहे. महिलांच्या कंपाऊंड प्रकारात भारताने निर्भेळ यश प्राप्त केले आहे. कंपाऊंड प्रकारात पुरुष आणि महिलांच्या संघाने बलाढ्य कोरियाचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. कंपाऊंड प्रकारात महिलांच्या एकेरीमध्ये प्रगती, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि ब्राँझपदके जिंकली आहेत. प्रियांश, ओजस देवतळे यांनी पुरुषांच्या कंपाऊंडमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकांची माळ आपल्या गळ्यात घातली. मिश्र प्रकारात भारताकडून निराशा झाली.

कंपाउंड प्रकारातील पदकविजेते

  • एकेरी (महिला)

  • प्रगती (सुवर्ण), आदिती (रौप्य) प्रणीत (ब्राँझ)

  • एकेरी (पुरुष)

  • प्रियांश (सुवर्ण), ओजस (रौप्य)

  • महिला आणि पुरुष संघ (सुवर्ण)

  • रिकर्व्ह प्रकारातील पदकविजेते

  • पुरुष संघ (सुवर्ण)

  • मिश्र संघ (रौप्य)

  • एकेरी (रिकर्व्ह प्रकार)

  • पार्थ साळुंखे (ब्राँझ)

टॅग्स :IndiawinnerArcherymedals