VIDEO LLC : मिचेल जॉन्सनला पठाण भिडला; प्रकरण गेलं धक्काबुक्कीपर्यंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yusuf Pathan-Mitchell Johnson Fight

VIDEO LLC : मिचेल जॉन्सनला पठाण भिडला; प्रकरण गेलं धक्काबुक्कीपर्यंत

Yusuf Pathan-Mitchell Johnson Fight : लिजेंड्स क्रिकेट लीगच्या क्वालिफायर सामन्यात भिलवाडा किंग्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात चुरशीची लढत झाली. या सामन्यात धावांचा पाऊस पडला दोन्ही संघांनी मिळून 450 हून अधिक धावा केल्या. पण भिलवाडा संघ फलंदाजी करत असताना अशी घटना पाहायला मिळाली ज्यामुळे या सामन्याची मजाच बिघडली. सामन्याच्या 19 व्या षटकात मिचेल जॉन्सन आणि युसूफ पठाण यांच्यातील बाचाबाची झाली. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Rohit Sharma : नाकातून रक्त येत होते तरी रोहितने सोडलं नाही मैदान, पाहा Video

सामन्यादरम्यान जॉन्सनने मर्यादा ओलांडली, तेव्हा युसूफ त्यांच्याशी भिडला आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली. प्रथम युसूफने कूल हरवून जॉन्सनला ढकलले आणि नंतर जॉन्सननेही हात मागे न घेता पठाणलाही धक्का दिला. मध्येच पंच आले नसते तर हे प्रकरण आणखी गंभीर झाले असते. रिपोर्टनुसार, लेजेंड्स क्रिकेट लीगचे आयोजक चांगलेच संतापले आहेत. असे मानले जाते की मिचेल जॉन्सनवर एक सामन्याची बंदी देखील घातली जाऊ शकते, कारण त्याने भांडणाला सुरूवात केली.

हेही वाचा: IND vs SA : युझवेंद्र चहलचे चाळे; आफ्रिकेच्या खेळाडूला मारली लाथ; Video व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिशेल जॉन्सनचा चाहते खूप ट्रोल करत आहेत. त्याचवेळी या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील इंडिया कॅपिटल्सने येथे 4 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भिलवाडा किंग्जने शेन वॉटसनच्या 65 धावा आणि युसूफ पठाणच्या 48 धावांचा समावेश करत 226 धावा केल्या. तथापि इंडिया कॅपिटल्सने हे लक्ष्य गाठले, त्यांच्यासाठी रॉस टेलरने 84 धावांची धडाकेबाज खेळी खेळली.