युवराज निवृत्त होतोय, पण बीसीसीआयची परवानगी हवी

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मे 2019

आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सने युवराजला घेतले होते; पण त्याला फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळे तो भविष्याबाबत विचार करीत आहे. युवराज खेळल्यास आपल्या लीगला प्रसिद्धी मिळेल, असा कॅनडा, डब्लीन; तसेच ऍमस्टलवीन लीग संयोजकांचा विचार आहे. झहीर खान आणि वीरेंदर सेहवाग दुबईतील टी-10 लीगमध्ये खेळू शकतात, तर युवराजलाही परवानगी द्यायला हवी, असा एक मतप्रवाह आहे. 

नवी दिल्ली : आठ वर्षांपूर्वी भारताने विश्वकरंडक जिंकत असताना युवराज सिंग सर्वोत्तम ठरला होता. आता भारतीय संघ पुन्हा विश्वकरंडक जिंकण्याची पूर्वतयारी करीत असताना युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेण्याचा विचार करीत आहे. परदेशातील लीगच्या सहभागाची परवानगी भारतीय मंडळाने दिल्यासच आपण निवृत्तीचा निर्णय घेणार असल्याचे संकेत युवराजने दिले आहेत. 

युवराज आंतरराष्ट्रीयच नव्हे; तर प्रथम श्रेणी क्रिकेटचा निरोप घेण्याचा विचार करीत आहे; पण त्यापूर्वी तो भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-

युवराज निवृत्त होतोय, पण बीसीसीआयची परवानगी हवी

आयपीएल असो वा वर्ल्ड कप... प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuvraj Singh asking permission from BCCI to retire from International Cricket