Yuvraj Singh : बापानं मुलाला दिलं '6 सिक्सेस'चं बाळकडू; VIDEO होतोय व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yuvraj Singh Son Orion Keech Singh Six Sixes Video

Yuvraj Singh : बापानं मुलाला दिलं '6 सिक्सेस'चं बाळकडू; VIDEO होतोय व्हायरल

Yuvraj Singh Son Orion Keech Singh Six Sixes Video : भारताचा माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बराच काळ लोटला. मात्र त्याने पहिल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूत ठोकलेल्या सहा षटकारांची चर्चा अजूनही मोठ्या प्रमाणावर होते. बरोबर 15 वर्षापूर्वी युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडची चांगलीच धुलाई केली होती. 15 वर्षानंतरही हा व्हिडिओ पाहताना रोमांचकारी अनुभव येतो. युवराजने देखील आज हाच व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे यावेळी त्याचा 9 महिन्याचा मुलगा देखील आपल्या बापाच्या मांडीवर बसून हा व्हिडिओ डोळ्याची पापणीही न हलवता पाहिला.

हेही वाचा: Pakistan Jersey : बाबर आझम चट्ट्यापट्ट्यात; पाकिस्तानची नवी जर्सी फुल्ल टू कॉमेडी

2007 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातील सामन्यात युवराज सिंगने 19 वे षटक टाकणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूत सहा षटकार मारत इतिहास रचला होता. युवराजने 12 चेंडूतच आपले अर्धशतक पूर्ण केले. युवराजच्या या 16 चेंडूत केलेल्या 58 धावांच्या जोरावर भारताने 20 षटकात 4 बाद 218 धावा उभारल्या. भारताने हा सामना 18 धावांनी जिंकला. या घटनेला आज 15 वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून युवराजने एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला.

हेही वाचा: IND vs AUS : रोहित म्हणतो, आता चर्चा बंद! प्लॅन अॅक्टिव्ह करण्याची वेळ

या व्हिडिओत युवराज सिंग आपल्या 9 वर्षाच्या मुलासोबत सहा चेंडूत सहा षटकार मारलेला व्हिडिओ पाहताना दिसतो. युवराज आपल्या मुलाला मांडीवर बसवून हा व्हिडिओ दाखवत आहे. मुलगा ऑरिऑन देखील टक लावून हा व्हिडिओ पाहत आहे. युवराजने या व्हिडिओला, '15 वर्षानंतर या सहा चेंडूत मारलेल्या सहा षटकार पुन्हा पाहताना यापेक्षा भारी पार्टनर मिळू शकला नसता.'

युवराज सिंगने 2007 मध्ये स्कॉटलँडविरूद्ध टी 20 पदार्पण केले होते. त्याने 58 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहेत. यात त्याने 1 हजार 177 धावा ठोकल्या आहेत. त्यात 8 अर्धशतकांचाही समावेश आहे. त्याने टी 20 मध्ये 7.06 च्या सरासरीने 28 विकेट्सही घेतल्या आहेत. सध्या तो इंडिया लेजंड संघाकडून रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज खेळत आहे. या संघाचे नेतृत्व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर करतोय.

Web Title: Yuvraj Singh Watch T20 World Cup 6 Sixes Video With Son Orion Keech Singh On Celebrating The 15 Years Of Six Sixes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..