IND vs AUS : रोहित म्हणतो, आता चर्चा बंद! प्लॅन अॅक्टिव्ह करण्याची वेळ

Indian Captain Rohit Sharma Say Stop Discussions Time to Execute Plans
Indian Captain Rohit Sharma Say Stop Discussions Time to Execute Plansesakal

India Vs Australia Mohali : भारत उद्यापासून (20 सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरूद्धच्या सहा टी 20 सामन्यांची मालिका सुरू होत आहे. टी 20 वर्ल्डकप पूर्वी होत असलेली ही मालिका म्हणजे भारताला वर्ल्डकपमधील प्लेईंग इलेव्हन घेऊन खेळण्याची नामी संधी आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा देखील आपल्या खेळाडूंकडून या मालिकेत थोडी जोखीम घेऊन खेळण्याची अपेक्षा करत आहे. रोहित शर्मा बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हणाला की, त्याला संघात एक सुरक्षित वातावरण तयार करायचं आहे. म्हणून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वीच वर्ल्डकपचा संघ जाहीर करण्यात आला. (Indian Captain Rohit Sharma Say Stop Discussions Time to Execute Plans)

Indian Captain Rohit Sharma Say Stop Discussions Time to Execute Plans
Team India : रोहितच्या कर्णधारपदाखाली 'या' खेळाडूचे करिअर संपली!

रोहित शर्मा म्हणतो की, 'या सहा सामन्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने चाचपणी करणार आहोत. या मालिकेत आम्ही मैदानावर स्वतःला सिद्ध करण्याचा, नवनवीन गोष्टी आजमावून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. संघासाठी तुम्ही वेगवेगळ्या दिशेने तुमचा विकास करू शकता.'

कर्णधार रोहित शर्माच्या मते विराट कोहली हा आमचा सलामीचा तिसरा पर्याय आहे. केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा टी 20 वर्ल्डकपसाठीची सलामी जोडी असेल.

Indian Captain Rohit Sharma Say Stop Discussions Time to Execute Plans
Video : योगींच्या राज्यात लाईव्ह मॅचमध्येच बत्ती गुल; चाहत्यांनी केला दंगा...

रोहित शर्मा म्हणतो की, 'आम्ही अशाच पद्धतीने खेळणे कायम ठेवणार आहोत. याचबरोबर जर अडचण आलीच तर आमची सेकंड लाईन ऑफ डिफेन्स कशी असेल हे आम्हाला माहिती आहे. आम्ही याबाबत दीर्घ काळ चर्चा केली. आता खेळाडूंना जर आमची अवस्था 3 बाद 10 धावा अशी झाली तर कशा प्रकारे फलंदाजी करायची याची पूर्ण कल्पना आली आहे. जर आमच्या बिनबाद 50 धावा झाल्या तर कशी फलंदाजी करायची याची देखील खूप चर्चा झालेली आहे. आता या प्लॅन्सवर अॅक्शन घेण्याची वेळ आली आहे.'

रोहित पुढे म्हणाला की, 'आम्हाला कशा प्रकारे खाळायचं आहे याबाबत सर्वांमध्ये विश्वासाचे वातावरण आहे. हा एक चांगला संकेत आहे. या सहा सामन्यानंतर आम्ही पुन्हा एकदा एक रिव्ह्यू मिटिंग घेणार आहोत. ही 10 महिन्यातील दुसरी रिव्ह्यू मिटिंग असेल. या मिटिंगमध्ये आम्हाला वर्ल्डकपसाठी अजून काय करण्याची गरज आहे याबाबत चर्चा केली जाईल.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com