
भारतीय क्रिकेट संघाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला. चहल आणि धनश्री मुंबईतील वांद्रे फॅमिली कोर्टात पोहोचले. या घटस्फोटाच्या बदल्यात धनश्री वर्माला चहलकडून ४.७५ कोटी रुपये पोटगी मिळाली आहे. त्यापैकी २.३७ कोटी रुपये चहलने धनश्रीला दिले आहेत. चहल जेव्हा कोर्टवर पोहोचला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता. त्यानंतर त्याने घातलेला टी शर्ट चर्चेत आला आहे. यावर खास संदेश लिहिला होता.