Yuzvendra Chahal : 'इतका दबाव लग्नावेळी देखील नव्हता' सामन्यानंतर चहलचा VIDEO व्हायरल

Yuzvendra Chahal Post Match Video Gone Viral After 2nd ODI Match Against West Indies
Yuzvendra Chahal Post Match Video Gone Viral After 2nd ODI Match Against West Indiesesakal

त्रिनिदाद : भारताने वेस्ट इंडीज विरूद्धचा (West Indies Vs India) दुसरा सामना अवघ्या 2 विकेट्सनी जिंकत मालिका खिशात टाकली. वेस्ट इंडीजने भारतासमोर विजयासाठी 312 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करताना भारताचे 8 फलंदाज खर्ची पडले. मात्र अष्टपैलू अक्षर पटेलने (Axar Patel) 35 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. यानंतर भारतीय संघातील फिरकीपटू युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) भारताचा विजय साकारणारी जोडी अक्षर पटेल आणि आवेश खान यांची सामन्यानंतर मुलाखत घेतली. या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चागंलाच व्हायरल (Video Viral) होत आहे.

Yuzvendra Chahal Post Match Video Gone Viral After 2nd ODI Match Against West Indies
MS Dhoni : आम्रपाली ग्रुप प्रकरणी धोनीला सर्वोच्च न्यायालयाची नोटिस

युझवेंद्र चहल या व्हिडिओत म्हणतो की, 'मी माझी सर्व नखे कुरतडून टाकली आहेत. बाहेर बासणाऱ्यांवर खूप दबाव होता. इतका दबाव होता की लग्नावेळी देखील इतका दबाव वाटला नव्हता.'

Yuzvendra Chahal Post Match Video Gone Viral After 2nd ODI Match Against West Indies
Lovlina Borgohain : ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लोव्हलिनाने मानसिक छळाचा केला आरोप

युझवेंद्र चहलच्या या पहिल्याच कमेंटवर अक्षर पटेल आणि आवेश खान दोघेही हसू लागले. यानंतर अक्षर पटेलने सांगितले की, मोक्याच्या क्षणी चांगली खेळी करणे विशेष असते. या खेळीमुळे मालिका विजय मिळाला याचा आनंद जास्त आहे. मी ज्यावेळी खेळण्यास गेलो त्यावेळी षटकात 10 ते 11 धावांचे उद्दिष्ट ठेवले होते. आम्हाला आयपीएलचा अनुभव असल्याने आम्ही हे करू असे वाटत होते.

अक्षर पटेल पुढे म्हणाला की, 'आम्ही स्वत:ला शांत ठेवत होतो. ही खेळी खूप खास आहे कारी मी 2017 नंतर पहिलीच वनडे खेळत होतो. माझे पहिले अर्धशतक याच सामन्यात पूर्ण झाले.' भारताचा कर्णधार शिखर धवनने देखील अष्टपैलू पटेलचे कौतुक केले. तो म्हणाला, 'ज्या पद्धतीने अक्षर पटेल खेळला ते खूप भारी होतं. आमचे देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल क्रिकेट आम्हाला मोठ्या प्रेक्षकांसमोर मोठ्या सामन्यात खेळण्यासाठी तयार करते. अक्षर म्हणाल्यानुसार त्याने हे आयपीएलमध्ये अनेकवेळा केले आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com