Yuzvendra Chahal : 1, 0, 6, 6, 4, W.... दोन लेग स्पिनरमध्ये जुंपली; अखेर श्रेयस अय्यरने...

Yuzvendra Chahal
Yuzvendra Chahalesakal

Yuzvendra Chahal : भारताचे 374 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची अवस्था भारतीय वेगवान गोलंदाजांनी 5 बाद 161 धावा केली होती. उमरान, सिराजने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या तर शमीने 1 विकेट घेत आपले खाते उघडले होते. सामन्याची स्थिती पाहता श्रीलंका फारसा प्रतिकार करेल असे वाटत नव्हते.

Yuzvendra Chahal
Umran Malik : उमरान मलिकने वनडेतही रचला इतिहास; कोणाला जमलं नाही ते करून दाखवलं

दुसरीकडे सामन्यात फिरकी गोलंदाजाला एकही विकेट मिळाली नव्हती. त्यात 32 व्या षटकात युझवेंद्र चहल गोलंदाजीला आला. युझवेंद्र चहलच्या समोर श्रीलंकेचा लेग स्पिनर वानिंदू हसरंगा होता. युझवेंद्र चहल आपल्या विकेटचे खाते या षटकात उघडेल असे वाटत होते. मात्र दोन बॉल वाट पाहिल्यानंतर हसरंगाने आपला दानपट्टा सुरू केला. त्याने चहलच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर देखील हसरंगाला षटकार मारण्यात यश आले.

वाटले की हसरंगा भारताच्या लेग स्पिनरची पिसे काढून लेग स्पिनमध्ये आपणच बाप असल्याचे सिद्ध करणार. हसरंगाने हे सिद्ध करण्यासाठी चहलच्या पाचव्या चेंडूवर चौकार देखील मारला. मात्र अखेर चहलने शेवटच्या षटकाच्या चेंडूवर हसरंगाला बाद करत आपला बदला घेतला.

Yuzvendra Chahal
IND vs SL : विराटने शतक करताच X फॅक्टर सूर्या म्हणणारा गंभीर झाला ट्रोल; भन्नाट Memes Viral

गुवाहाटीच्या मैदानावर दव पडत असल्यामुळे दुसऱ्या डावात फिरकीपटूंना गोलंदाजी करण्यात अडचणी येतात. मात्र त्यातही चहलने आक्रमक वानुंदूला बाद करत आपल्या विकेट्सचे खाते उघडले. श्रेयस अय्यरने चांगला झेल घेतला. कारण हा झेल घेण्यासाठी उमरान मलिक आणि अय्यर यांच्यात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र अय्यरने झेल घेतला अन् चहलचा जीव भांड्यात पडला.

(Sports Latest News)

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com