Chahal And Dhanashree : धनश्री वर्मा विशाला म्हणाली 'I LOVE YOU' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yuzvendra chahal wife dhanashree verma

Chahal And Dhanashree : धनश्री वर्मा विशाला म्हणाली 'I LOVE YOU'

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma : भारतीय खेळाडू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसोबत सतत रील शेअर करत असते. नुकतेच धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून 'चहल' हे आडनाव काढून टाकले ज्यानंतर बरीच चर्चा रंगली होती. मात्र, धनश्रीने नंतर आपले स्पष्टीकरण देत असे का केले, याचा खुलासा केला. आता धनश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चहलच्या पत्नीने विशाल नावाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आय लव्ह यू म्हटले आहे.

हेही वाचा: Video : Ind-Pak सामन्यापूर्वी विराट-बाबरची भेट, चाहत्यांमध्ये वातावरण तापले

धनश्रीने हा व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय लेग स्पिनरची पत्नी 'माही वे' गाण्यावर डान्स करत आहे. विशाल नावाच्या या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासोबतच त्याने आय लव्ह यू असेही म्हटले आहे. आता धनश्रीच्या या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. विशाल नावाचा हा व्यक्ती दुसरा कोणी नसून धनश्रीचा भाऊ आहे. धनश्रीचा भाऊ फिटनेस प्रशिक्षक देखील आहे. मात्र धनश्रीने शेअर केलेला व्हिडिओ 2021 च्या रक्षाबंधनाचा आहे.

धनश्रीने याआधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, या व्हिडिओमध्ये ती पती युजवेंद्र चहलसोबत दिसत आहे. धनश्रीने एक इन्स्टाग्राम रील शेअर केला आहे, ज्यामध्ये चहल सोबत पुन्हा एकदा मजेदार व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. या मजेदार व्हिडिओमध्ये धनश्री वर्मा म्हणते की, मी एका महिन्यासाठी माझ्या माहेरच्या घरी जात आहे. यानंतर युजवेंद्र चहल आनंदाने नाचू लागतो.

Web Title: Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Said Brother Vishal I Love You Wishing Birthday Sports Cricket Asia Cup 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..