esakal | काहीही हं नेटकऱ्यांनो; धनश्रीसोबत नाचले म्हणून बाहेर बसले!
sakal

बोलून बातमी शोधा

काहीही हं नेटकऱ्यांनो; धनश्रीसोबत नाचले म्हणून बाहेर बसले!

काहीही हं नेटकऱ्यांनो; धनश्रीसोबत नाचले म्हणून बाहेर बसले!

sakal_logo
By
सुशांत जाधव

युएई आणि ओमानच्या मैदानात रंगणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला खास जबाबदारीसह पुन्हा संघात बोलवण्यात आले. दुसरीकडे अनुभवी आणि आयसीसी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम नावे असलेल्या शिखर धवनला (Shikhar Dhavan) डच्चू देण्यात आला. विराट कोहलीच्या लाडक्या युजवेंद्र चहलचाही (Yuzvendra Chahal) पत्ता कट झालाय. एवढेच काय दिल्लीकर श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) राखीव खेळाडूत जागा मिळाली आहे.

हेही वाचा: VIDEO : सोशल मीडियावर रंगलीये श्वानाच्या खतरनाक फिल्डिंगची चर्चा

चहल, शिखर धवन आणि श्रेयस अय्यर टीम इंडियात स्थान मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर आता चहलची पत्नी आणि कोरियोग्राफर धनश्री वर्माला नेटकरी ट्रोल करत आहेत. टी-20 वर्ल्ड कपसाठी चहलला डच्चू देतील असा विचार कुणीच केला नव्हता. पण अनपेक्षितपणे अश्विनला संधी देत चहलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियावर वेगेवगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना काही नेटकरी धनश्रीला लक्ष्य करत आहेत.

धनश्री वर्मानं आपल्या आईसोबतचा एक फोटो शेअर केलाय. यावर नेटकरी धनश्रीला ट्रोल करताना दिसते. चहलच नव्हे तर धवन आणि श्रेयस अय्यर संघाबाहेर जाण्यास धनश्री जबाबदार असल्याचा अजब तर्क नेटकरी लावत आहेत. जो कोणी धनश्रीसोबत नाचला तो संघाबाहेर राहिला; अशा आशयाच्या प्रतिक्रिया तिच्या पोस्टवर उमटत आहेत.

हेही वाचा: पाकचा माजी क्रिकेटर म्हणतो, विराट विरोधात 'डर्टी गेम'

यापूर्वी शिखर धवन (Shikhar Dhawan) धनश्री (Dhanashree Verma) सोबत भांगडा करताना दिसला होता. धनश्रीने शिखर धवनसोबतही काही डान्स स्टेप केल्याचे पाहायला मिळाले. याचा संदर्भ टीम इंडियाच्या सिलेक्शनची जोडत काही लोक तिला नाहक ट्रोल करताना दिसते.

loading image
go to top