esakal | अजिंक्य रहाणेच्या जागेसाठी 'टीम इंडिया'कडे आहेत 'हे' दोन पर्याय
sakal

बोलून बातमी शोधा

Ajinkya-Rahane

अजिंक्य रहाणेच्या जागेसाठी 'टीम इंडिया'कडे आहेत 'हे' दोन पर्याय

sakal_logo
By
विराज भागवत

खराब फॉर्ममुळे भारताचा उपकर्णधार ठरतोय टीकेचा धनी

Ind vs Eng 4th Test: भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा सध्या धावा करण्यासाठी झगडताना दिसतोय. भारताचा कर्णधार विराट कोहलीही या मालिकेत अद्याप फारसा चमकलेला नाही. पण विराटने मालिकेत दोन वेळा ४०हून जास्त धावा केल्या आहेत. अजिंक्यला मात्र एका अर्धशतकाशिवाय इतर सामन्यात फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघाने अजिंक्य रहाणेला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला तर त्याच्या जागी खेळण्यासाठी भारतीय संघाकडे दोन पर्याय आहेत, असे मत माजी क्रिकेटपटू जहीर खान याने सांगितले.

हेही वाचा: तुझ्या धैर्याला तोड नाही; अजिंक्यच्या बायकोची भावूक पोस्ट

"जेव्हा भारताची सलामी जोडी चांगली कामगिरी करत नाही तेव्हा भारताच्या मधल्या फळीवर किती दडपण असते हे आपण या मालिकेत आणि विशेषत: तिसऱ्या कसोटीत पाहिले आहे. त्यामुळे आता भारतीय संघाने थोडासा धाडसी निर्णय घेणे गरजेचे आहे. मी आधीही म्हटल्याप्रमाणे अजिंक्य रहाणे लौकिकाला साजेसा खेळ करण्यास अपयशी ठरतोय. अशा परिस्थितीत अजिंक्य रहाणेच्या जागीच भारताला दुसरा खेळाडू खेळवण्याचे धाडस घेणं गरजेचं आहे. भारताकडे सूर्यकुमार यादव आणि हनुमा विहारी हे दोन पर्याय आहेत. जर संघ व्यवस्थापन अजिंक्य रहाणेला संघाबाहेर करणार असेल तर त्यांनी या दोन पर्यायांचा विचार नक्कीच करायला हवा", असे क्रिकबझशी बोलताना जहीर खान म्हणाला.

हेही वाचा: "अजिंक्य रहाणे टीम इंडियाची डोकेदुखी; त्याला बाहेर बसवा"

अजिंक्य बचावासाठी राधिका सरसावली...

अजिंक्य रहाणे खराब कामगिरीमुळे ट्रोल होतोय. चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यातून रहाणेला डच्चू देऊन दुसऱ्या खेळाडूला संधी द्यावी, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील संघर्षमय परिस्थितीत अडकलेल्या अंजिक्यच्या बचावासाठी त्याची पत्नी राधिका हिने एक खास मेसेज दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून दशकपूर्तीबद्दल तिने भावूक संदेश लिहिला आणि अजिंक्यच्या टीकाकारांनाही टोला लगावला. राधिकाने इंस्टाग्रामच्या माध्यमातून खास पोस्ट शेअर केली. "दहा वर्षांचा पल्ला कधी पार केलास समजलंच नाही. पहाटे पाच वाजता मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास, देशांतर्गत क्रिकेटमध्ये वर्षांनुवर्ष घेतलेली मेहनत आणि आंतरराष्ट्रीय कॅप मिळवण्याची प्रतिक्षा! आतापर्यंतच्या प्रवासात अनेक चढ-उताराचा सामना केलास. कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची तुझी साहसी वृत्ती आजही कायम आहे. तुझा इथपर्यंतचा प्रवास अभिमानास्पद आहे. मी नेहमीच तुझ्यासोबत आहे", असं तिने लिहिलं आणि अजिंक्यला पाठिंबा दर्शवला.

loading image
go to top