
भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे हे लोकप्रिय सेलिब्रेटी जोडप्यांपैकी एक आहे. गेली अनेक वर्ष ते सुखी संसार करत असून आता त्यांच्या आयुष्यात आणखी मोठे सुख आले आहे.
त्यांनी बुधवारी (१६ एप्रिल) चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. झहीर आणि सागरिका हे दोघे नुकतेच आई-बाबा झाले असून याबद्दल त्यांनी याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे.